सिनेसृष्टीमध्ये आतापर्यंत तुम्ही अनेक गुन्हे घडल्याचे ऐकले असेल. कधी अमली पदार्थ, तर कधी महिलांवरील अत्याचार. अशात सध्या शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रामुळे बॉलिवूड चांगलंच ट्रोल झालं आहे. बॉलिवूडमध्ये सतत काही ना काही विचित्र घटना घडत असतात. अशात आता मराठी सिनेसृष्टीमध्ये देखील खळबळजनक घटना घडू लागल्या आहेत.
अभिनेता भरत जाधवच्या नावाचा गैरवापर करून काही व्यक्तींकडून लुटमार केली जात आहे. भरत जाधवचा नवीन चित्रपट येत आहे. त्या चित्रपटाचे ऑडिशन सुरू आहे आणि तुम्हाला लवकरच त्या चित्रपटांमध्ये काम मिळेल. असे आश्वासन देऊन काही व्यक्ती भोळ्याभाबड्या जनतेकडून रोख पैसे लुटत आहेत. (Bharat jadhav Warned his fans that don’t pay Any fees for any audition)
हा संपूर्ण प्रकार स्वतः अभिनेत्याने समोर आणला आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ती सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. भरतने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “काल एका व्यक्तीचा मला मेसेज आला की, तुमच्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी मुंबईतील एका एजंटने आमची ऑडिशन घेतली आहे. आमचे सिलेक्शन झाले असून फोटोशूट आणि पुढील कामांसाठी त्याने आमच्याकडे १५००० रुपयांची मागणी केली.”
भरतने त्याला आलेल्या अनुभवाबद्दल सांगत पुढे त्याच्या चित्रपटाविषयी खुलासा केला आणि लिहिले की, “माझ्या कोणत्याही सिनेमाचं असं कुठेही ऑडिशन सुरू नाही. जर कोणी व्यक्ती माझ्या नावाचा गैरवापर करून माझ्या बरोबरचा फोटो दाखवत सिनेमात काम मिळवून देतो असे आश्वासन देत असेल तर, अशा भूलथापांना बळी पडू नका. कोणालाही पैसे देऊ नका. संबंधित व्यक्तीवर लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई होईल.”
भरत जाधवने शेअर केलेल्या या पोस्टवर त्याचे अनेक चाहते कमेंट करत आहेत. त्यातील एकाने कमेंटमध्ये असे लिहिले आहे की, “दादा सध्या बऱ्याच ठिकाणी अशी लुटमार सुरू आहे. फेसबुकसारख्या ऍपवर फेक अकाउंट खोलून घाणेरड्या मागण्या केल्या जात आहेत.”
भरत जाधवच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आतापर्यंत अनेक विनोदी भूमिका साकारल्या आहेत. ‘अगबाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘खबरदार’, ‘मुंबईचा डबेवाला’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘आप्पा आणि बाप्पा’ अशा अनेक चित्रपटांमधून त्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध
-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज