छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजना अर्थात रुपाली भोसले हिने नुकतीच बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी यांची भेट घेतली. या भेटीचा अनुभव रुपालीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे शेअर केला आहे. रुपाली भोसले हिने ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील संजना या भूमिकेमुळे लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेत ती एक खलनायिकेची भूमिका साकारते. मराठी मालिकांप्रमाणेच रुपालीने हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे.
रुपालीने(Rupali Bhosle) पोस्ट करताना लिहिले की, “ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांना प्रत्यक्षात पाहण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा योग आल्याने मी खूप भाग्यवान आहे. त्यांचं सौंदर्य आणि व्यक्तिमत्व खरंच अद्भुत आहे. मी त्यांना रंगभूमीवर लाइव्ह सादरीकरण करताना पाहिलं आणि मला खरंच मंत्रमुग्ध झाले. त्यांनी माझे कौतुक केले आणि मला प्रोत्साहन दिले. हे माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठं यश आहे.”
रुपाली आणि हेमा मालिनी यांची भेट एका कार्यक्रमादरम्यान झाली होती. या कार्यक्रमात रुपालीने हेमा मालिनी यांच्यासोबत नृत्य सादर केले. हेमा मालिनी यांनी रुपालीच्या नृत्याचे कौतुक केले आणि तिला पुढील वाटचालीत यश मिळावे अशी शुभेच्छा दिल्या. रुपालीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी रुपालीला हेमा मालिनी यांच्याकडून मिळालेल्या कौतुकाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
यावर कमेंट करताना एकाने लिहिले की, “ह्रदयाची राणी असलेली ड्रीम गर्ल रुपाली” दुसऱ्याने लिहिले की, “तू सुद्धा हेमा मालिनी सारखीच सुंदर आहेस.” तर आणखी एकाने लिहिले की, “खूप लकी आहेस…सुंदर रुपाली” सध्या रूपालीची हि पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. रूपाली सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. (Bharavali Rupali Bhosle met dream girl Hema Malini)
आधिक वाचा-
–पडद्यावर सायली आणि प्रिया एकमेकींचं तोंडही बघणं करतात नापसंत; खऱ्या आयुष्यात आहेत कट्टर मैत्रिणी
–जसप्रीत बुमराहसोबत जोडलं जायचं राशी खन्नाचं नाव, तर आज ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री