Monday, March 4, 2024

जसप्रीत बुमराहसोबत जोडलं जायचं राशी खन्नाचं नाव, तर आज ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री

तेलुगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राशी खन्ना हिने अगदी कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे. दिल्लीत जन्मलेल्या राशीने तेलुगूसोबतच हिंदी, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे. 2013 मध्ये रिलीझ झालेल्या जॉन अब्राहमच्या ‘मद्रास कॅफे’ या चित्रपटातही राशी दिसली होती. हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. तिने 2014 मध्ये तेलुगू चित्रपटांमध्ये पदार्पण केले. तिच्या सुरुवातीच्या चित्रपटांनी मोठ्या पडद्यावर चांगली कमाई केली.  गुरूवारी अभिनेत्री तिचा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 30 नोव्हेंबर 1990 रोजी, दिल्लीमध्ये झाला होता.

सुरुवातीच्या चित्रपटाने साऊथमध्ये मिळवून दिले नाव
राशीने 2014 मध्ये आलेल्या ‘उहालु गुसागुसालदे’ या चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि राशीच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले. यानंतर अभिनेत्री ‘जिल’ आणि ‘जोरू’ या चित्रपटांमध्ये दिसली, ज्यांना प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. 2015 मध्ये ती अभिनेता रवी तेजासोबत ‘बंगाल टायगर’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर ठरला आणि त्याने भरपूर कमाई केली. राशी खन्नाची इंडस्ट्रीत तशीच सुरुवात झाली, जशी प्रत्येक कलाकाराला त्यांच्या चित्रपटांसाठी हवी असते. राशीने ‘इमैका नोदिएगल’, ‘अयोग’, ‘राजा द ग्रेट’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. (happy birthday raashi khanna know interesting facts about actress on her birthday)

जसप्रीत बुमराहसोबत जोडले जायचे नाव
चित्रपटसृष्टी आणि क्रिकेटचे नाते जुने आहे. असे अनेक क्रिकेटर्स आणि अभिनेत्री आहेत ज्यांच्या अफेअरच्या बातम्या सतत येत असतात. अभिनेत्री राशी खन्नाचे नावही जसप्रीत बुमराहसोबत जोडले गेले आहे. 2018 मध्ये जसप्रीत आणि राशी डेट करत असल्याची बातमी आली होती. मात्र एका चॅट शोमध्ये राशीने जसप्रीतबद्दल वक्तव्य केले होते. राशी म्हणाली होती, “मला माहित नाही की जसप्रीत कोण आहे. मला फक्त एवढंच माहीत आहे की, तो एक क्रिकेटर आहे. मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही.” चॅट शोमध्ये राशीने स्पष्ट केले होते की, ती कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये नाही. ती म्हणाली, “सोशल मीडियावर महिलेशी संबंधित अशा अफवा पाहून वाईट वाटते.”

कोटींची आहे मालकीण
माध्यमातील वृत्तानुसार, राशी खन्ना जवळपास 15 कोटी रुपयांची मालक आहे. तज्ञांच्या मते, ती एका चित्रपटासाठी सुमारे 30 लाख रुपये घेते आणि ती अनेक ब्रँडच्या जाहिराती देखील करते. 2017 मध्ये राशीने हैदराबादमध्ये स्वतःचे घर विकत घेतले आहे आणि ती कुटुंबासह तिथे शिफ्ट झाली आहे.

हेही वाचा-
आदिल खानला धक्का; प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंतला दिलासा; खासगी न्यायालयाने घेतला ‘हा’ निर्णय
पडद्यावर सायली आणि प्रिया एकमेकींचं तोंडही बघणं करतात नापसंत; खऱ्या आयुष्यात आहेत कट्टर मैत्रिणी

हे देखील वाचा