Thursday, December 4, 2025
Home बॉलीवूड भारती सिंह-हर्ष लिम्बाचिया; लग्नाच्या आठ वर्षांच्या आठवणी साजऱ्या, सोशल मीडियावर प्रेमाचा इजहार

भारती सिंह-हर्ष लिम्बाचिया; लग्नाच्या आठ वर्षांच्या आठवणी साजऱ्या, सोशल मीडियावर प्रेमाचा इजहार

कॉमेडी क्वीन भारती सिंह (Bharathi Singh)आणि लेखक-निर्माता हर्ष लिम्बाचिया यांनी आज त्यांच्या वैवाहिक आयुष्याची आठवी वर्षगाठ साजरी केली. या खास प्रसंगी भारतीने सोशल मीडियावर एक गोड आणि प्रेमळ पोस्ट शेअर करून चाहत्यांना आनंदाचा संदेश दिला.

भारतीने इंस्टाग्रामवर हर्ष आणि मुलगा गोला सोबतचा व्हिडिओ कोलाज शेअर केला. या व्हिडिओमध्ये कुटुंबाचे अनेक सुंदर क्षण टिपले गेले आहेत. काही फोटोंमध्ये भारतीचा बेबी बंप स्पष्ट दिसत असून, हर्ष आणि गोला एकसारखे कपडे घालून दिसत आहेत. भारती ब्राउन रंगाच्या ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये प्रेग्नंसी ग्लोससह अतिशय सुंदर दिसत आहे. या व्हिडिओसोबत भारतीने कॅप्शन दिले – “आठ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी गोले आणि काजूच्या मम्मी–पप्पाचा लग्न झाली होता.” तसेच पतीसाठी तिने प्रेम व्यक्त करत लिहिले – I Love You.

भारतीच्या या पोस्टवर सेलेब्स आणि फॅन्सनी भरभरून शुभेच्छा दिल्या. जॅस्मिन भसीनने लिहिले – हॅप्पी एनिव्हर्सरी मीका सिंहने टाळ्या इमोजीसह “बधाई हो”, चंदन प्रभाकरने “मुबारक” आणि दिव्यांका त्रिपाठी दहियाने “आपणा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” असे संदेश पाठवले.

या प्रेमळ पोस्टने सोशल मीडियावर गोड वातावरण निर्माण केले असून फॅन्ससह सेलेब्सनीही जोडप्याच्या या खास दिवशी आनंद व्यक्त केला. आठ वर्षांच्या लग्नानंतरही भारती आणि हर्ष यांचे नाते तितकेच गोड आणि प्रेमळ आहे. या खास दिवसाने त्यांच्या कुटुंबाचे कौटुंबिक नाते आणि एकमेकांवरील प्रेम पुन्हा एकदा चाहत्यांसमोर सादर केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

रश्मिकाने AI जनरेटेड अश्लील फोटोंवर व्यक्त केली नाराजी; म्हणाली, ‘असे करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.’

हे देखील वाचा