Friday, July 5, 2024

नोरा फतेहीच्या ‘त्या’ कृत्यामुळे रागाने लालेबु्ंद झाली भारती सिंग; तिला भरस्टेजवरून हात ओढत घेऊन गेली आणि…

भारती सिंग ही टेलिव्हिजनवरील एक असे नाव आहे, जिची फक्त उपस्थितीच प्रेक्षकांना पुरेशी असते. ती दिसता क्षणीच कॉमेडी तिच्या बॉडी लँग्वेजमधून दिसते. भारती सिंग या दिवसात ‘डान्स दीवाने ३’ हा शो होस्ट करत आहे. शोच्या सेटवर ती तिचा पती हर्ष लिंबाचियासोबत मस्ती करताना दिसत असते. प्रेक्षकांना नेहमीच हास्याच्या महासागरात नेऊन सोडणाऱ्या भारती सिंगचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये रागाने लालेबुंद होऊन नोरा फतेहीला स्टेजवरून खाली ओढताना दिसत आहे.

सोशल मीडियावर भारती सिंगचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नोरा फतेही आणि भारती सिंग दिसत आहेत. त्या दोघीही हर्षसोबत ‘ये मेरा दिल प्यार का दीवाना’ या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. नोरा हर्षच्या अगदी जवळ जाऊन डान्स करत होती, हे भारतीला अजिबात आवडले नाही. (Bharti sing dragged nora fatehi on dance deewane 3 set due to this reason)

त्या दोघांचा डान्स बघून भारती स्टेजवर येते. यानंतर भारती नोरा सोबत डान्स करतात. तिथेच डान्स करता करता मस्तीमध्ये हर्ष आणि नोरा खाली पडतात. त्यानंतर भारती नोराचा हात पकडुन ओढत नेताना दिसत आहेत. तर हर्ष तिला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सगळेजण त्याच्या या मजेशीर व्हिडिओला जोरदार पसंती दर्शवत आहेत.

भारती सिंगच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच कपिल शर्मा सोबत ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये दिसणार आहे. तिचे चाहते या शोची आतुरतेने वाट बघत आहेत. नोरा फतेहीने अनेक गाण्यांमध्ये डान्स केला आहे. तिचे ‘दिलबर’ आणि ‘हाय गर्मी’ हे गाणे चांगलेच प्रसिद्ध झाले होते. तसेच ती लवकरच ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यासोबत काम करणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अवघड आहे! ‘ते’ गाणं श्रेया घोषालला पडतंय बरंच महागात, लाखो चाहते करताय ट्रोल

-आर्थिक संकटातून जात आहे ‘बालिका वधू’चे कुटूंब; अभिनेत्रीच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख

-जिममध्ये ‘रफ ऍंड टफ’ वर्कआऊट करताना दिसली उर्वशी रौतेला; सौंदर्यातच नव्हे, तर फिटनेसमध्ये ही देते सर्वांना टक्कर

हे देखील वाचा