Friday, July 5, 2024

‘ना नईं सुनना’ पंजाबी गाण्यात भारतीची झलक; अवघ्या १२ तासांतच गाठला ७ लाखांहून अधिक व्ह्यूजचा टप्पा

प्रेक्षकांमध्ये हिंदी गाण्यांपेक्षा पंजाबी गाण्याची क्रेझ अधिक पाहायला मिळते. गाणे कसेही असो, त्यात जर पंजाबी भाषेचा तडका लावला तर गाणे हिट झाल्याशिवाय राहत नाही. अलीकडेच, पंजाबी गायक जिगर सरैया आणि निकिता गांधी यांचे नवीन गाणे ‘ना नईं सुनना’ रिलीझ झाले आहे. या गाण्यात टीव्हीची ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंगने पदार्पण केले आहे. याव्यतिरिक्त, गाण्यात भारती सिंगसोबत टीव्ही अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा आणि गायक जिगर सरैय्यादेखील देखील दिसले आहेत.

हे पंजाबी गाणे 3 मिनिटे 2 सेकंदाचे आहे, ज्यामध्ये भारती सिंग काही क्षणांसाठीच दिसली आहे. ‘ना नईं सुनना’ या गाण्याला 12 तासांत 7 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

या गाण्यात भारती सिंगची भूमिका खूपच कमी असली, तरी तिने यातूनही प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. तसेच, या व्हिडिओमध्ये ती एकही शब्द बोलताना दिसली नाही. गाण्यात सतत पुनरावृत्ती होणारी एक ओळ आहे, ती म्हणजे ‘मैं ना नई सुनना जी.’ हे गाणे पाहायला भारती सिंगचे चाहते खूप उत्साही आहेत.

भारतीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती तिच्या आगामी शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याव्यतिरिक्त, ती शूटिंग सेटवरून तिचे बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. यापूर्वी भारती सिंग तिच्या पतीबरोबर टीव्ही शो ‘इंडिया बेस्ट डान्सर’ होस्ट करताना दिसली होती.

क्रिस्टलबद्दल बोलायचं झालं, तर एकता कपूरच्या ‘कहीं ना कहीं’ या मालिकेद्वारे तिने अभिनयाची सुरुवात केली होती. काही काळानंतर, क्रिस्टलने ‘किस देश में है मेरा दिल’, ‘एक हजारों में मेरी बेहना है’ आणि ‘एक नई पहचान’ मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यापैकी ‘एक हजारों में मेरी बेहना है’ या मालिकेतून तिला खरी ओळख मिळाली. पुढे 2014 मध्ये तिने एकता कपूरची काल्पनिक मालिका ‘ब्रह्मराक्षस’ मध्ये रैनाची भूमिका साकारली, जी खूप गाजली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ये मैं हू, ये मेरा घर है और यहा…’, राखी सावंतने शेयर केला व्हिडिओ; चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

-नेहा कक्कर अन् गुरु रंधावा प्रथमच आले एकत्र, पाहा या जोडीचे ‘और प्यार करना है’ हे ताजं गाणं

-भारतीय सैनिकाच्या पत्नीच्या व्यथा सांगणारं ‘तुम बिन’ गाणं युट्यूबलर करतंय राडा, हिट्सचा पडतोय पाऊस

हे देखील वाचा