Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड ‘आरआरआर’ने ऑस्कर जिंकल्याचा आनंदात भारतीच्या मुलाने केला जल्लाेश, व्हिडिओ व्हायरल

‘आरआरआर’ने ऑस्कर जिंकल्याचा आनंदात भारतीच्या मुलाने केला जल्लाेश, व्हिडिओ व्हायरल

कॉमेडी क्वीन भारती सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचा मुलगा गोलासोबतचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. अशात तिने अलीकडेच तिच्या चाहत्यांसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा मुलगा गोल डान्स करताना दिसत आहे. खरे तर, या डान्स व्हिडीओची खास गोष्ट म्हणजे गोला आरआरआर चित्रपटातील ऑस्कर विजेते ‘नाटू नाटू‘ गाण्यावर डान्स करत आहे. गोलाचा हा व्हिडिओ साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यावर चाहते भिन्नभिन्न कमेंट करत आहे.

भारती सिंहने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “आज गोलाला समजले की, द एलिफंट व्हिस्पर्स आणि आरआरआरला ऑस्कर मिळाला आहे, ज्याने ताे आनंदी झाला.” भारती सिंगच्या या व्हिडिओवर त्यांचे चाहते सतत कमेंट करत आहेत.

कॉमेडी क्वीनचा हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते गोलावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका युजर्सने कमेंट करत लिहिले की,  “खूप गोंडस आहे.”, तर आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, “देवाचा आशिर्वाद सतत तुझ्यावर असाे…”

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

12 मार्च रोजी ऑस्कर अवॉर्डचे आयोजन करण्यात आले होते. या 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये, एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याने, तसेच द एलिफंट व्हिस्पर्स या डॉक्यूमेंट्री चित्रपटाने ऑस्कर पुरस्कार जिंकला.

एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाने जागतिक स्तरावर चांगले यश मिळवले आहे. यापूर्वी चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉन्गचा गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाला होता. आतापर्यंत या चित्रपटाने अनेक यश आपल्या नावावर केले आहे.(bharti singh shared a video of son gola dancing on natu natu oscar winning song of film rrr)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
2 वर्षात 100 ट्यून बनवल्या, पण 9 च सिलेक्ट झाल्या; चित्रपटातील गाणी आणि नृत्याने रचला इतिहास

ये है मोहब्बतें फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, गोव्यात मोठ्या दणक्यात केले लग्न

हे देखील वाचा