Friday, May 24, 2024

कॉमेडीची क्वीन असलेल्या भारती सिंगने देखील केला बॉडी शेमिंगचा सामना, विविध नावांनी उडवायचे तिची टिंगल

आज कॉमेडी हे नाव जरी उच्चारले तरी डोळ्यासमोर भारती सिंगचा चेहरा आपोआपच येतो. भारतीने मोठ्या संघर्षाने आणि मोठ्या मेहनतीने हे मोठे यश मिळवले आहे. मनोरंजनविश्वात काम करण्यासाठी तिच्याकडे कोणताही कॅमेऱ्यावर लोकांना आकर्षक वाटणारे रूप नव्हते. असे असूनही तिने अनेकांना खोटे ठरवत आज या क्षेत्रात मोठी आणि स्थिर ओळख कमावली आहे. अजोड मेहनत आणि प्रतिभा या गोष्टींवर विश्वास ठेऊन पुढे जाणाऱ्या भरतीच्या आयुष्यात देखील अनेकदा कठीण काळ आला. मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे गेली. आज संपूर्ण जगत तिला कॉमेडी क्वीन म्हणून ओळखले जाते. मात्र, याच भारतीने अतीव दुःख, लोकांचे टोमणे सहन केले आहे. याबद्दल तिने स्वतः खुलासा केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

भारतीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, तिला तिच्या वजनावरून अनेकदा लोकांचे टोमणे आणि मनाला त्रास देणारे बोलणे ऐकावे लागायचे. तिच्या करियरच्या सुरुवातीच्या काळात तर हे खूप झाले. तिने मुलखतीमध्ये सांगितले की, “तिला वेगवेगळ्या नावानी ओळखले जायचे, बोलावले जायचे. तिला कोणी जाड, कोणी हत्ती देखील म्हणायचे. ती म्हणाली की तिने ती जाड आहे ही बाब स्वीकारली आहे. ती म्हणाली, “मी काही हलवाईंची मुलगी नाही, मी तर मिडिल क्लास पण नाही गरीब क्लास आहे. तसे पण मी जेवून जेवून जाड झाली तर आता काय करू? मी माझ्या जाडपणामुळे आधी देखील खुश होती, आज पण आहे आणि पुढे देखील असेल. मी जशी आहे, तशी खूप आनंदी आहे.”

भारतीने पुढे तिच्या लग्नाबद्दल सांगितले. ती म्हणाली, “हर्ष आणि मी एकमेकांच्या प्रेमात होतो. जेव्हा आम्ही लग्न करण्याचे ठरवले तेव्हा देखील आम्हाला खूप ट्रोल केले गेले. लोकांना वाटते की, एका जाड मुलीने जाड मुलीशीच लग्न केले पाहिजे. मात्र तेव्हा मी विचार केला, हे माझे आयुष्य मी कोणाशीपण लग्न करेल.” दरम्यान भारती आणि हर्ष यांनी 2017 साली लग्न केले. त्यानंतर एप्रिल 2022रोजी तिने एका मुलाला जन्म दिला. हे दोघं विविध शोमध्ये सूत्रसंचालक आणि स्पर्धक म्हणून अनेकदा दिसतात.(bharti singh open up on body shaming)

अधिक वाचा-
“…तर मी दोन मुलांची आई असते”, अभिनेत्री केतकी चितळेच मोठ वक्तव्य; एकदा वाचाच
अभिनेत्री शिबानी दांडेकरच्या बहिणीने उडवली चाहत्यांची झोप; बिकिनीतील फोटो व्हायरल

हे देखील वाचा