Saturday, March 15, 2025
Home मराठी या वर्षी होणार विनोदाची मेजवानी, ‘भिरकिट’ चित्रपटातील नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला,

या वर्षी होणार विनोदाची मेजवानी, ‘भिरकिट’ चित्रपटातील नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला,

गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनात ‘भिरकीट’ नावाच वादळ घोंगावत आहे. ‘भिरकीट’ च्या ट्रेलरला व गाण्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता आणखी एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्या गाण्याचे बोल ‘डोळ्यावर गॉगल लावा’ असे आहे. हे गाणे लावणी पद्धतीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या गाण्यातून प्रेक्षकांमध्ये चांगलाच हश्या पिकणार आहे. ‘डोळ्यावर गॉगल लावा’ या गाण्याला उर्मिला धनगर (urmila dhangar) व मंगेश कांगणे (mangesh kanjane) यांचा ठसकेदार आवाज मिळाला असून मंगेश कांगणे यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे. १७ जून रोजी ‘भिरकीट’ नावाचे वादळ संपूर्ण महाराष्ट्रात येणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणतात, ‘भिरकीट’ चित्रपटात प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी मिळणार आहे. ‘डोळ्यावर गॉगल लावा’ हे गाणे लावणी पद्धतीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात विनोद आणि कौटुंबिक संबंधाबरोबरच ठसकेदार लावणी ही पहायला मिळणार आहे. नक्कीच हे गाणं प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे.

क्लासिक एंटरप्राइज प्रस्तुत व अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘भिरकीट’ चित्रपटाची निर्मीती सुरेश जामतराज ओसवाल व भाग्यवंती ओसवाल यांनी केली असून पटकथा व संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण मीर व संकलन फैजल महाडिक यांनी केले आहे.शैल व प्रितेश या जोडीचे धमाल संगीत लाभलेल्या या चित्रपटाच्या वितरणाची धुरा युएफओने सांभाळली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा