Thursday, April 18, 2024

मजेशीर किस्सा! जेव्हा आमिर, शर्मन अन् माधवनने चक्क दारू पिऊन केला होता ‘३ इडियट्स’मधील ‘तो’ सीन शूट

कलाकार अनेकदा आपला अभिनय अगदी खरा वाटावा म्हणून खूप मेहनत घेत असतात. मोठमोठे स्टंट्स स्वतः करतात, वजन, केस वाढवतात- कमी करतात आदी अनेक गोष्टी कलाकार प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणि अभिनय जिवंत वाटावा यासाठी करतात. असाच ‘3 इडियटस’ संदर्भातला एक किस्सा शरमन जोशीने शेअर केला आहे.

नुकताच अभिनेता आर. माधवनने त्याचा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माधवनचा सहकलाकार असलेल्या शरमन जोशीने त्याच्या वाढदिवसाचे निमित्त साधून 2009मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘3 इडियटस’ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देत एक किस्सा सांगितला आहे.

या चित्रपटात आमिर खानने ‘रँचो’, माधवनने ‘फरहान’ आणि शरमन जोशीने ‘राजू’ ही भूमिका साकारली होती. या तिघांचाही चित्रपटात एक सीन आहे, ज्यात हे तिघं एकत्र बसून दारू पितात आणि व्हायरसला म्हणजेच बोमन इराणीला कोसत असतात. हा सीन करताना हे तिघेही खरोखर दारू प्यायले होते. हा सीन खरा आणि जिवंत वाटावा यासाठी ही कल्पना आमिर खाननेच सर्वांना दिली होती. शरमन म्हणाला, “मी आणि आमिरने दारू प्यायला सुरुवात केली, तेव्हा मॅडी एका कामात व्यस्त होता. मात्र, तो आल्यावर त्यानेही थोडी घेतली आणि मग आम्ही हा सीन शूट केला.”

पुढे शरमन म्हणाला, “मॅडी जास्त दारू पीत नाही. मात्र, त्याने आमच्यासोबत बसून आमच्याशी गप्पा मारल्या होत्या. तुम्ही जर हा सीन पहिला तर आमचे डोळे, हावभाव हे सर्व इतके खरे का वाटत आहे याचे उत्तर आज सर्वांना मिळाले असेल. हा सिनेमा आमच्या तिघांच्याही आयुष्यातील सर्वात मस्त आणि अविस्मरणीय असा आहे. आमच्या तिघांच्याही करियरमधला महत्त्वाचा सिनेमा ठरला होता. मॅडी खूप चांगला व्यक्ती आणि आणि अभिनेता आहे.” खरं तर ‘३् इडियट्स’ या सिनेमाने कमालीची कामगिरी केली होती. या चित्रपटाने जवळपास 460 कोटी रुपयांची कमाई केली होती.(sharman joshi aamir and r madhwan get drunk for 3 idiots scene)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY : पैसे कमावण्यासाठी समंथा रूथ प्रभेने केले होते मॉडेलिंगमध्ये पदार्पण, ‘इतके’ होते पहिले मानधन
समंथा रुथ प्रभूची दहावीची मार्कशीट झाली व्हायरल, गणिताचे आकडे पाहून तुम्ही व्हाल थक्क

हे देखील वाचा