Friday, July 5, 2024

अभिनेते खासदार मनोज तिवारींना कन्यारत्न, सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली गुडन्यूज

कोरोनामुळे २०२० हे वर्ष वाईट आणि कटू आठवणींनी भरलेले असताना वर्षाचा शेवट मात्र मनोज तिवारी यांच्यासाठी आनंददायी ठरला आहे. दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष आणि भोजपुरी सुपरस्टार अभिनेते मनोज तिवारी यांच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांच्या घरी बुधवारी कन्यारत्नाचं आगमन झालं. मनोज तिवारी यांनी ट्विट करून ही माहिती सर्वांना दिली. सोबतच त्यांनी त्यांच्या चिमुकलीचा एक फोटोदेखील शेअर केला आहे.

‘मेरे घर आयी एक नन्ही परी… I am blessed with a baby girl…’’जय जगदंबे’ , असे ट्विट करत त्यांनी त्यांचा आनंद सर्वांसोबत वाटला. मनोज तिवारी यांचे हे ट्विट आणि इनस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, राजकारणी, कलाकार आणि त्यांचे फॅन्स त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मनोज तिवारी यांना याआधी देखील जिया नावाची एक मुलगी आहे. जिया मुंबईमध्ये शिक्षण घेत असून मनोज नेहमी तिला भेटायला मुंबईला येत असतात.

मनोज तिवारी यांनी १९९९ साली गायिका राणी तिवारीसोबत लग्न केले होत, मात्र त्यांचे लग्न १२ वर्षांनी तुटले व २०१२ साली मनोज आणि राणी यांनी घटस्फोट घेतला. जिया ही राणी आणि मनोज यांची मुलगी आहे. त्यानंतर त्यांनी सुरभी यांच्याशी लग्न केले. आता झालेली मुलगी ही मनोज आणि सुरभी यांची आहे. जिया ही नेहमीच लाइमलाइट पासून दूर असते.

समाजवादी पक्षातून राजकारणात प्रवेश करणारे मनोज तिवारी यांनी २०१३ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या लोकसभेत निवडणुकीत उत्तर पूर्व दिल्लीतून त्यांना भाजपकडून तिकिट मिळाले. त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश अग्रवाल यांना हरवले. त्यानंतर ते भाजपचे अध्यक्ष झाले.

मनोज तिवारी यांच्या अभिनयाबद्दल सांगायचे झाले तर मनोज हे भोजपुरी भाषेतील सुपरस्टार आहे. २००३ मध्ये मनोज यांनी ससुरा बड़ा पैसेवाला चित्रपटात भूमिका साकारली होती. हा सिनेमा हिट झळा होता त्यानंतर त्यांनी वे दरोगा बाबू आई लव यू, बंधन टूटे ना या हिट सिनेमात काम केले. २०१० च्या बी बॉसच्या चौथ्या पर्वात ते स्पर्धक म्हणून सुद्धा दिसले. ‘गैंग्स ऑफ वासेपुर’ या सिनेमात त्यांनी जिया हो बिहार के लाला हे गाणे देखील गायले आहे.

हे देखील वाचा