Thursday, April 24, 2025
Home भोजपूरी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी सुपरस्टार खेसारी आपल्या म्हशींसाठी करायचा ‘चोरी’, गरिबीमुळे पत्नीही द्यायची साथ

चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी सुपरस्टार खेसारी आपल्या म्हशींसाठी करायचा ‘चोरी’, गरिबीमुळे पत्नीही द्यायची साथ

भोजपुरी इंडस्ट्रीमधील कलाकारांनी संपूर्ण देशावर आपली जादू केली आहे. या इंडस्ट्रीमध्ये एकपेक्षा एक अव्वल कलाकार आहेत. परंतु हे यश त्यांना सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. या यादीत भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादवचाही नंबर लागतो. खेसारी लाल यादवचे खरे नाव शत्रुघ्न यादव असे आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘चोरी चोरी चुपके चुपके’ हा चित्रपट बिहार आणि झारखंडमधील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने जबरदस्त ओपनिंग केली. या चित्रपटात खेसारी लाल यादवसोबत अभिनेत्री सहर अफसादेखील मुख्य भूमिकेत दिसत आहे.

अभिनेता खेसारी लाल यादव हा सध्या यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. परंतु हे यश मिळवण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे. त्याने त्याच्या जीवनात केलेला हा संघर्ष सर्वांसाठी प्रेरणा देणारा आहे. खेसारीने लिट्टी-चोखा विकण्याचे काम तसेच दूध विकण्याचे काम केले आहे. तो त्याच्या म्हशींना खायला घालण्यासाठी चोरी करायचा. अभिनयाच्या सुरुवातीच्या काळात त्याने नृत्य आणि ऑर्केस्ट्रामध्येही काम केले. त्याने एकदा खुलासा केला होता की, तो आपले गरिबीचे दिवस कधीही विसरत नाही, तो त्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो.

म्हशींसाठी करायचा चोरी
खेसारी लाल यादवने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, जेव्हा तो म्हशी राखायचा आणि म्हशींचे दूध विकायचा. अनेकदा तो दुधात पाणी मिसळायचा. कारण त्याला त्यातून १०-२० रूपये जास्तीचे मिळतील. इतकेच नव्हे, तर तो इतरांच्या शेतातून मोहरी आणि मका चोरी करायचा. कारण त्यामुळे तो आपल्या म्हशीचे पोट भरू शकेल. त्याचा रोजचा वेळ त्याच्या म्हशींच्या संगोपनात गेला. त्याचबरोबर त्याने गवत कापण्याचे कामही केले आहे.

गरीब परिस्थितीत केले लग्न
खेसारी लालची आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची होती. अशाच परिस्थितीत त्याचा विवाह देखील झाला. जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी खेसारी लाल हा त्याच्या पत्नीला घेऊन दिल्लीला गेला. याच दरम्यान, खेसारीने लिट्टी-चोखाचे दुकान टाकले. यामध्ये त्याला त्याची पत्नी देखील मदत करायची. पत्नी लिट्टीमध्ये सत्तू भरत असे आणि तो ते बेक करायचा. आर्थिक परिस्थिती इतकी हालाकीची होती की, त्याची पत्नी चंदाला अनेक महिने एका साडीवर दिवस काढावे लागले होते.

सरकारी नोकरी सोडली
अभिनेता खेसारी बराच काळ सरकारी नोकरीच्या तयारी करत होता. त्याची बीएसएफमध्ये निवड देखील झाली होती. मात्र, त्याचे या नोकरीत कधीच मन नव्हतं. त्यानंतर तो ही नोकरी सोडून पुन्हा दिल्लीला परतला. दिल्लीत येऊन त्याने आपला भोजपुरी अल्बम काढला. खेसारीने ‘माल भेटाई मेला’ हा पहिला भोजपुरी अल्बम काढला. त्याच्या या अल्बमने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले. हे त्याच्या या कारकिर्दीतील पहिले यश होते.

पहिल्याच चित्रपटामुळे बनला स्टार
खेसारी लाल यादव हा इथेच थांबला नाही, तर त्याने चित्रपटातही आपला हात आजमावला. त्याने २०१२ मध्ये त्याचा पहिला भोजपुरी चित्रपट ‘साजन चले ससुराल’ हा काढला. या चित्रपटाने त्याला एका रात्रीत स्टार बनवले. या यशानंतर, खेसारीने कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याचबरोबर त्याला नशिबानेही तशीच साथ दिली. तो एकामागून एक यशाच्या शिड्या चढत गेल्या.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘…सांग मग कधी येऊ बोलणी करायला?’ प्राजक्ता माळीचा व्हिडिओ पाहून चाहत्याने घातली थेट लग्नाची मागणी

-‘बिग बॉस ओटीटी’चा किताब जिंकून घरी परतली दिव्या; बॉयफ्रेंड वरुणने खास अंदाजात केले स्वागत

-राखी सावंतला पती रितेशचा पाठिंबा, राघव चड्ढांच्या ‘या’ विधानावर घेतली त्यांची शाळा

हे देखील वाचा