Friday, December 1, 2023

खेसारी लाल यादवच्या ‘सन ऑफ बिहार’चा ट्रेलर रिलीज, चित्रपटात जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार अभिनेता

भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता खेसारी लाल यादवसन ऑफ बिहार‘ या चित्रपटातून पुन्हा एकदा माेठ्या पडद्यावर झळकणार आहे. अशात आज म्हणजेच शुक्रवारी (16 जुन)ला या अभिनेत्याच्या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात खेसारी अॅक्शन करताना दिसणार आहे.

‘सन ऑफ बिहार’च्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच खेसारी काही लोकांना जोरदार मारहाण करताना दिसत आहे. चित्रपटात खेसारी एका वकिलाच्या मुलाची भूमिका साकारत आहेत. अशात घरच्या जबाबदाऱ्यांपासून दूर राहून अभिनेता स्वत:चं वेगळे जीवन जगत आहेत. चित्रपटात खेसरीला मस्तमौलाच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. जो कधी बारमध्ये जातो, तर कधी लोकांशी भांडताना दिसतो. त्यामुळे त्याचे वडील खूप नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटात वडील आणि मुलामधील वादविवादही दाखवण्यात आले आहेत.

या सगळ्यात चित्रपटात ट्विस्ट तेव्हा येताे, जेव्हा काही गुंड चित्रपटातील नायिकेची शाळा मोडतात आणि ती तिची केस लढण्यासाठी खेसरीच्या वडिलांकडे जाते. अशात खेसरीचे वडील अभिनेत्रीला आश्वासन देतात की, ते केस जिंकतील आणि तिला न्याय मिळवून देतील. मात्र, असे काहीही होऊ शकत नाही. कारण, ते गुंड खेसरीच्या वडिलांना जीवाने मारतात. अशात वडिलांच्या मृत्यूनंतर खेसारी वकील म्हणून खटला लढण्यासाठी न्यायालयात पोहोचतो.

‘सन ऑफ बिहार’मध्ये खेसारी लाल यादव सोबत मणि भट्टाचार्य, रक्षा गुप्ता, अयान खान, महेश आचार्य, गौरी शंकर आणि रजनीश पाठक सारखे दिग्गज कलाकार महत्वाची भूमिका साकारत आहे. अशात आता ट्रेलरनंतर अभिनेत्याचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.(bhojpuri actor khesari lal yadav movie son of bihar released trailer out now know what is the story of film )

अधिक वाचा-
मुलाच्या मेहंदीत ‘नच पंजाबन’ गाण्यावर सनी देओलने केला भांगडा, व्हिडिओ एकदा पाहाच

कंगनाने लग्नाच्या प्रश्नावर साेडले मौन; म्हणाली, “मला लग्न करायचे आहे, पण…’

हे देखील वाचा