Sunday, April 14, 2024

मुलाच्या मेहंदीत ‘नच पंजाबन’ गाण्यावर सनी देओलने केला भांगडा, व्हिडिओ एकदा पाहाच

धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा लाडका करण देओल लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. या दरम्यान, संपूर्ण देओल कुटुंब आनंद साजरा करत आहे. अशात करणच्या मेहंदीपासून ते लग्नापर्यंतचे फाेटाे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान, सनी देओलचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो आपल्या मुलाच्या लग्नाच्या फंक्शनमध्ये डान्स करताना दिसत आहे. या साेबतच बॉबी देओलही या उत्सवी वातावरणात सनीला पाहून हसताना दिसत आहे.

सनी देओल (sunny deol) सहसा डान्स टाळताना दिसतो, पण मुलाचे लग्न आहे आणि वडिल आनंदात सामिल हाेणार नाही असे हाेऊ शकते का? अशात सनी देओल मुलगा करणच्या मेहेंदी साेहळ्यामध्ये भांगडा करताना दिसला, ज्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर चांगलाच व्हायरल हाेत आहे. व्हिडिओमध्ये सनी फुल ब्लॅक लूकमध्ये ‘नच पंजाबन’ गाण्यावर भांगडा करताना दिसत आहे, तर शेजारी बॉबी देओलही आपल्या मोठ्या भावाच्या डान्सचा आनंद घेताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

अशात या व्हायरल व्हिडिओवर चाहतेही भन्नाट कमेंट करत आहेत. एक चाहत्याने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, ‘इतक्या वर्षांनंतरही त्याच्या डान्स मूव्हज तशाच आहेत.’, तर दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट केली की, ‘अशा पद्धतीने डान्स करा की, चार जण विचारतील, भावा तुला करायचे काय आहे?’ अशाप्रकारे चाहते कमेंट करत व्हिडिओचा आनंद घेत आहेत.

करणचा मेहंदी साेहळा 15 जून रोजी आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान करणच्या मेहंदीपेक्षा वडील सनी देओलच्या मेहंदीचीच जास्त चर्चा झाली. खरं तर, या खास मेहंदी फंक्शनमध्ये सनीच्या हातावर सर्व धर्मांची चिन्हे होती.(bollywood actor sunny deol dance on son karan deol and drisha roy wedding function bobby deol also join elder brother )

अधिक वाचा-
हाॅटनेसचा कहर! शहनाझ गिलने समुद्र किनारी केले फाेटाेशूट
कंगनाने लग्नाच्या प्रश्नावर साेडले मौन; म्हणाली, “मला लग्न करायचे आहे, पण…’

हे देखील वाचा