Sunday, April 20, 2025
Home बॉलीवूड मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

अभिनेते लहान असले तरी त्यांचे यश आणि मेहनत ही मोठी गोष्ट आहे. असेच एक अभिनेते सध्या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. या अभिनेत्याचे नाव के.के. गोस्वामी असे आहे. त्यांनी टीव्हीपासून चित्रपट उद्योगापर्यंत आपल्या कामगिरीतून बरेच नाव कमावले आहे. अभिनेते के.के. गोस्वामी हे शुक्रवार (३ सप्टेंबर) आपला ४८ वा वाढदिवस साजरा करतात. बिहारमधील एका छोट्या गावात गोस्वामी यांचा जन्म झाला. त्यांनी या क्षेत्रात आपले नाव कमावण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्यांच्या लहान उंचीमुळे त्यांच्यासमोर संघर्षाचा भला मोठा डोंगर उभा होता. पण गोस्वामी यांनी कधीच जिद्द सोडली नाही.

त्यांनी हिंदी आणि भोजपुरीच्या अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. यासोबतच त्यांनी ‘शक्तिमान’, ‘विक्रल गॅब्रल’, ‘सीआयडी’, ‘चक्रवर्ती सम्राट अशोक’, ‘कनिष्ठ जी’, ‘चाचा चौधरी’, ‘भूत अंकल’ यांसारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. यामुळे ते बऱ्याच वेळा चर्चेत होते. गोस्वामी यांनी १९९७ मध्ये ‘शक्तिमान’ या मालिकेतून पदार्पण केले. या मालिकेत त्यांनी खली-बलीची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका आज ही सर्वांच्या लक्षात आहे. (The idol is small but the glory is great! K.K. Goswami struggled to reach the pinnacle of success)

सुपर स्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गंगा’ या चित्रपटात त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारली. त्यांच्या या भूमिकेतून त्यांनी सिद्ध केले की, उंचीने लहान असून ही त्यांच्यामध्ये प्रतिभेची कमतरता नाही. अमिताभ यांच्या हस्ते त्यांच्या कामाला मान्यता मिळाली, ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. यासोबतच त्यांनी भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये ही आपल्या अभिनयाच्या जोरावर स्थान निर्माण केले. त्यांनी इंडस्ट्रीच्या जवळपास सर्व मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.

के.के. गोस्वामी हे सध्या मुंबईत राहतात. कामासोबतच त्यांचे वैवाहिक आयुष्य देखील खूप सुखात ते जगत आहेत. त्यांच्या लग्नाच्या वेळी त्यांच्या सासरच्यांनी या लग्नाला नकार दिला होता. पण त्यांची पत्नी पिंकू या लग्नावर ठाम होत्या. त्यांची उंची कमी असूनही, त्यांच्या पत्नीने त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आश्वासन दिल्यानंतरही गोस्वामी लग्नाची वरात घेवून जाण्यास भीती वाटत होती. त्यांना भीती होती की, संपूर्ण गावात वरात घेऊन गेलो आणि जर मुलीने नकार दिला तर काय होईल?

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थचा अंतिम प्रवास सुरू, लवकरच होणार पंचतत्वात विलीन

-‘मृत्यू हे आयुष्यातील सर्वात मोठे…’, मृत्यूनंतर सिद्धार्थ शुक्लाचे जुने ट्वीट व्हायरल

-सिद्धार्थ शुक्लाने शहनाझ गिलच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास? म्हणाली, ‘मी आता कसं जगू शकेन’

हे देखील वाचा