भोजपुरी सिनेसृष्टीतून आनंदाची बातमी समोर येत आहे. भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी वडील बनले आहेत. त्यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. विशेष म्हणजे, ते तिसऱ्यांदा वडील बनले आहेत. वडील बनल्याचा आनंद त्यांनी चाहत्यांसोबतही शेअर केला आहे. त्यांनी रुग्णालयात पत्नी सुरभीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. आता चाहते आणि कलाकार मंडळीही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहे.
मनोज तिवारी यांनी दिली आनंदवार्ता
अभिनेते मनोज तिवारी (Actor Manoj Tiwari) यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत लिहिले की, “हे कळवताना अत्यंत आनंद होत आहे की, माझ्या घरी लक्ष्मीनंतर सरस्वतीचे आगमन झाले आहे. आज घरात एका लाडक्या मुलीचा जन्म झाला आहे. तुम्ही सर्वांनी तिला आशीर्वाद द्यावा. सुरभी-मनोज तिवारी.”
बड़े हर्ष के साथ सूचित करना है कि मेरे घर में लक्ष्मी के बाद सरस्वती का आगमन हुआ है..आज घर में प्यारी सी बिटिया पैदा हुई है.. उसपे आप सभी का आशीर्वाद बना रहे.. सुरभि-मनोज तिवारी pic.twitter.com/JJj1H82XEr
— Manoj Tiwari ???????? (@ManojTiwariMP) December 12, 2022
शेअर केलेल्या फोटोत मनोज तिवारी आणि त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समजते की, ते चिमुकलीच्या आगमनाने किती खुश झाले आहेत.
मनोज तिवारी तिसऱ्यांदा बनले वडील
मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी दोन लग्न केली आहेत. त्यांचे पहिले लग्न राणी तिवारी यांच्यासोबत झाले होते. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. त्यांनी काही काळानंतर घटस्फोट घेतला. या लग्नापासून मनोज यांना एक मुलगी आहे. तिचे नाव रीति तिवारी आहे. पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर मनोज हे पुन्हा प्रेमात पडले. त्यांनी 2020मध्ये सुरभी यांच्यासोबत संसार थाटला. त्यांना सुरभीकडून एक मुलगी आहे. तिचे नाव सान्विका आहे. आता मनोज आणि सुरभी हे आणखी एका मुलीचे आई-वडील झाले आहेत.
मनोज तिवारींची कारकीर्द
मनोज तिवारी यांनी त्यांच्या कारकीर्दीत ‘देशद्रोही’, ‘गंगा’, ‘ऐलान’, ‘देहाती बहू’, ‘जनम जनम के साथ’ यांसारख्या सिनेमात काम केले आहे. विशेष म्हणजे, 51 वर्षीय मनोज यांनी अभिनयासोबतच राजकारणातही हात आजमावला. ते भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. (bhojpuri actor manoj tiwari blessed with baby girl shared good news read here)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
उर्फी पुन्हा चर्चेत! कारण ठरलं पोलीस तक्रार; राग व्यक्त करत म्हणाली, ‘माझ्यावर लैंगिक…’
व्हिडिओ: टीनाची एन्ट्री आणि शालीनचा यू-टर्न; म्हणाला, ‘मी सिद्ध करून दाखवेल किती तडफडलोय’