Sunday, December 8, 2024
Home टेलिव्हिजन व्हिडिओ: टीनाची एन्ट्री आणि शालीनचा यू-टर्न; म्हणाला, ‘मी सिद्ध करून दाखवेल किती तडफडलोय’

व्हिडिओ: टीनाची एन्ट्री आणि शालीनचा यू-टर्न; म्हणाला, ‘मी सिद्ध करून दाखवेल किती तडफडलोय’

टीव्हीवरील प्रसिद्ध शो ‘बिग बॉस 16‘ सध्या भलताच चर्चेत आहे. ‘बिग बॉस 16’ स्पर्धक घरात वेगवेगळे खेळ खेळत आहेत. रविवारच्या (दि. 11 डिसेंबर) एपिसोडमध्ये टीना दत्ता घरातून बाहेर जाते. टीना घरातून बाहेर जाताच, शालीन भनोत टीनाविरोधात खूप काही बोलून जातो. मात्र, बिग बॉस पुन्हा डाव पालटून टाकतात आणि टीनाची पुन्हा घरात एन्ट्री होते. काही दिवसांपूर्वी एकमेकांच्या जवळ येणारी ही जोडी आता जरा बदलली आहे.

टीना आणि शालीनच्या नात्यात कटुता
टीना दत्ता (Tina Datta) ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16)मधील घरात पुन्हा आल्याने शालीन भनोत (Shalin Bhanot) याच्या चेहऱ्याचा रंग उडाला आहे. मात्र, शालीन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. यावर टीना शालीनला म्हणते की, जर तुला तुझ्या मित्राची आठवण येत होती, तर तुला आधीच माहिती असायला पाहिजे होतं की, तू त्या मित्राला कुठेही जाऊ दिले नसते. हे ऐकून शालीन त्याचे स्पष्टीकरण देत म्हणतो की, “यावर आपण आरामात बोलूया.” तो म्हणतो की, “ज्या मित्राला मी मिस करत होतो, त्याला मी आताही मिस करत आहे.” टीना म्हणते की, “त्या मित्राला तूच तुझ्या हातांनी मारले आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

टीना शालीनला म्हणते की, “मी तुझ्या ऍक्शनमुळे दु:खी झाले आहे. तसेच, माझे दु:खी होणे हे साहजिक आहे.” यावर शालीन म्हणतो की, “तुला काहीच कल्पना नाहीये. बाहेर पडू. मी तुला सिद्ध करून दाखवेल, मी दोन दिवसात काय काय केले नाही आणि मी किती तडफडलो, किती मेलो आहे.”

शालीनचे टीनापुढे स्पष्टीकरण
यानंतर पुन्हा शालीन टीनाशी बोलण्याचा प्रयत्न करतो. यावर टीना म्हणते की, “तू तर असाही म्हणाला की, कुणीही असते तरीही मी बजर वाजवला नसता.” ती त्याला विचारते की, “तुला सुंबुलसाठी का वाजवायचे होते?” यावर तो म्हणतो की, “जमीन आस्मानात फरक आहे.” तीदेखील म्हणते की, “होय जमीन आस्मानाचा फरक आहे माझ्यात आणि सुंबुलमध्ये.” त्यानंतर शालीन म्हणतो की, “जमीन आस्मानाचा फरक या परिस्थितीत आहे.” पुढे टीना म्हणते की, “तू मला दुखावले आहे.” यावर शालीन म्हणतो की, “दु:ख तर होणारंच कारण मी ते बोलतच नाहीये.”

आता या शोमध्ये पुढे काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
भावाचा विषयच हार्ड! प्रसिद्ध युट्यूबरच्या दोन्ही पत्नी एकाच वेळी प्रेग्नंट, नेटकरी म्हणाले, ‘दोघीही…’

काय सांगता! नोराने जॅकलीन विरोधात दाखल केला मानहानीचा खटला; म्हणाली, ‘बदनाम करण्याचा प्रयत्न…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा