बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत की त्यांची गाणी प्रदर्शित होताच क्षणीच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होतात. अशाच अभिनेत्यांपैकी एक नाव म्हणजे रीतेश पांडे. रितेशचं नविन गाणं आलं की प्रेक्षक जणू त्यावर तुटून पडतात. आताही रितेशचं नवीन गाणं युट्यूबवर आलं असून ते चाहत्यांमध्ये चांगलच व्हायरल होतं आहे. या गाण्यात रितेश पांडे सोबत भोजपुरी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ‘अक्षरा सिंह’ ही आहे. या गाण्यात प्रेक्षकांना रितेश आणि अक्षराची जोडी खूपच आवडल्याचे गाण्याला मिळालेल्या हिट्समधून दिसत आहे.
भोजपुरी सिनेमाचे लोकप्रिय गायक आपल्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत राहतात. रितेशही एक स्टाईलीश गायक व अभिनेता आहे. त्याला भोजपुरी प्रेक्षकांकडून नेहमी खूपच प्रेम मिळाले आहे. त्याचे चाहते त्याच्या कोणत्याच गाण्याला कधीच मिस करत नाही. जेव्हा जेव्हा त्यांचं नविन गाणं रिलिज होतं, तेव्हा तेव्हा ते प्रेक्षकांमध्ये जबरदस्त व्हायरल होतं. रितेश पांडेचं आताच गाणंही यूट्यूबवर असंच व्हायरल होतं आहे.
रितेश पांडे यांच्या या भोजपुरी गाण्याचे ‘रहबू कूल कूल’ असे बोल आहेत. हे सध्या यूट्यूबवर धमाल करत आहे. या गाण्यात रितेश पांडे आणि अक्षरा सिंह यांची केमिस्ट्री चांगलीच जमून आली आहे.
‘मजनूआ’ या भोजपुरी चित्रपटातील हे गाणे आहे. रितेश पांडे आणि प्रिया दुबे या दोघांनी मिळून हे भोजपुरी गाणं गायलं आहे. शेखर मधुर यांनी या गाण्याचे लेखणं केले आहे तर ‘मधुमर आनंद’ यांनी ह्या गाण्याला संगित दिले आहे.
हेही वाचा-
–भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाच्या पिरितीया के बानी पियासल गाण्याची कमाल; मिळाले ३० लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज
–विक्रमांचा विक्रम! भोजपुरी गायकाच्या गाण्याने केला विक्रम, तब्बल २५ कोटी हिट्स मिळवत केला नवा रेकॉर्ड
–व्हिडीओ शेअर करत अंकिताने इंटरनेटवर वाढवली धकधक, तरीही चाहत्यांनी घेतले फैलावर
–ढोलकीच्या तालावर थिरकले पद्मिनी कोल्हापुरे आणि मुलगा प्रियांकचे पाय; पाहा जबरदस्त डान्स
–मैं तेरा बॉयफ्रेंड गाण्यावर जेनेलियाने मुलांसोबत केली मजामस्ती; व्हिडिओला मिळाले ५ लाखांपेक्षा अधिक लाईक्स