Thursday, April 25, 2024

विक्रमांचा विक्रम! भोजपुरी गायकाच्या गाण्याने केला विक्रम, तब्बल २५ कोटी हिट्स मिळवत केला नवा रेकॉर्ड

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता खेसारी लाल यादव याच्या एका गाण्याने सोशल मीडिया आणि यूटुबवर जबरदस्त धूम माजवत रेकॉर्ड केला आहे. या गाण्याला खेसारी लालच्या फॅन्सने तुफान प्रतिसाद देत हे गाणे व्हायरल केले आहे. आतापर्यंत २५३ मिलियन अर्थात २५ कोटींपेक्षा जास्त व्हिव्ज खेसारी लालच्या गाण्याला मिळाले आहे.

या गाजणाऱ्या गाण्याचे बोल आहेत ‘आ जा आ जा ओ हैंडसम राजा, खुलल दरवाजा बा दिल समा जा’ हे गाणे
‘पागल बनईबे का’ नावाने देखील सर्च केले जात आहे. कोणत्याही गाण्याला २५३ मिलियन व्हिव्ज मिळणे हे एक रेकॉर्ड आहे. आतापर्यंत २५ कोटी ३० लाख लोकांनी हे गाणे पाहिले असून अजूनही या गाण्याच्या व्हिव्जमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे.

झी म्युझिक भोजपुरीने हे गाणे प्रदर्शित केले असून, या गाण्याला खेसारी लाल यादवसोबतच प्रियंका सिंहने गायले आहे. ‘दबंग सरकार’ अल्बमच्या या गाण्याला धनंजय मिश्रा यांनी संगीत दिले असून, आजाद सिंग यांनी बोल लिहिले आहे.

खेसारी लाल यादव हा भोजपुरी इंडस्ट्रीतला सुपरस्टार अभिनेता आहे. त्याने भोजपुरीच्या अनेक हिट अभिनेत्रींसोबत काम केले आहे. खेसारी हा ऍक्शन सोबतच विनोदी भूमिकांसाठी ओळखला जातो. प्रेक्षकांना खेसारी आणि काजल राघवानी यांची जोडी सर्वात जास्त आवडते. हे गाणे ज्या सिनेमातील आहे तो चित्रपट सुरुवातीपासूनच हिट समजला जात आहे.

मागच्या काही काळापासून खेसारी लाल म्हणजे यशाची ग्यारंटी झाला आहे. तो ज्या गाण्यात सिनेमात दिसतो ते सुपरहिट होतातच.

हे देखील वाचा