Monday, July 1, 2024

‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर ती सध्या ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये धमाल करत आहे. ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये अक्षराची स्टाईल चाहत्यांद्वारे खूप पसंत केली जात आहे. ती प्रत्येक मुद्द्यावर आपले मत व्यक्त करायला अजिबात लाजत नाही. याच दरम्यान नुकतेच अक्षराचे भोजपुरी गाणे प्रदर्शित झाले आहे. जे प्रदर्शित होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. अक्षराच्या या नवीन गाण्याचे बोल आहेत ‘ननदो के बड़ बा नथुनिया’.

अक्षराचे हे नवीन गाणे रक्षाबंधनाच्या विशेष प्रसंगी प्रदर्शित करण्यात आले असून, हे गाणे स्वतः अक्षरा सिंगने गायले आहे. तर याचे बोल कुंदर प्रीत यांनी लिहिले आहेत आणि संगीत आशिष वर्मा यांनी दिले आहे. शिवाय गाण्याला सुशांत चंदनने कोरिओग्राफ केले.

https://youtu.be/Whjce9D_YFY

हे गाणे अक्षरा सिंगवर चित्रित करण्यात आले आहे. अक्षरासोबत ‘नंदो के बाद बा नथुनिया’ गाण्यात विशाल सिंग देखील दिसला आहे. तो गाण्यात अक्षराचा पती विशालचे पात्र साकारत आहे. यात अक्षराने साडी घातलेली दिसत आहे. चाहत्यांना अक्षराचा हा लूक खूप आवडला आहे. यातील तिचे एक्सप्रेशन्स अप्रतिम आहेत. अक्षरा सिंगचे हे गाणे प्रदर्शित होऊन कमीच वेळ झाला आहे. मात्र आतापर्यंत हजारो युजर्सने हे गाणे पाहिले आहे.

अक्षरा सिंग आणि विशाल सिंग यांनी यापूर्वीही एकत्र काम केले आहे. याआधी दोघेही ‘फलनावा के बीटा सपनावा में आता है’ या गाण्यात दिसले आहेत. चाहत्यांना हे गाणे खूप आवडले होते. त्याचबरोबर सोशल मीडियावर देखील खूप व्हायरल झाले होते.

अक्षरा सिंगबद्दल बोलायचे झाले, तर आजकाल ती बिग बॉसमध्ये चांगली कामगिरी करत आहे. अक्षराचे वय आणि वजनाबद्दल तिच्यावर टीका करण्यात आली. त्यानंतर तिने सर्वांना सांगितले की, तिचे वजन कमी करून तिच्या वजनाबद्दल टीका करणाऱ्या सर्व लोकांना ती ते योग्य उत्तर देईल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ब्यूटी क्वीन’ डिंपल हयातीला रवी तेजाने दिले वाढदिवसाचे खास गिफ्ट; शेअर केला आगामी ‘खिलाडी’चा रोमॅंटिक पोस्टर

-खण स्कर्ट घालून रुपाली भोसलेने शेअर केले ‘हटके’ फोटोशूट, मात्र सर्वत्र रंगलीय ड्रेसची चर्चा

-‘ही’ व्यक्ती आहे अंकिता लोखंडेसाठी खूप खास; फोटो शेअर करत म्हणाली, ‘तू माझ्यासाठी…’

हे देखील वाचा