भोजपुरी सिनेसृष्टीत अशा अनेक कलाकार जोड्या आहेत, ज्यांना सुपरहिट जोडी म्हणून ओळख मिळाली आहे. त्यातीलच एक सुपरहिट जोडी म्हणजे दिनेश लाल यादव अर्थातच निरहुआ आणि आम्रपाली दुबे होय. या दोघांनीही जवळपास डझनभर सिनेमात एकत्र काम केले आहे. हे दोघे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. यामागील कारण आहे त्यांचे एक जुने गाणे, जे सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
निरहुआ (Nirhua) आणि आम्रपाली दुबे (Amrapali Dubey) यांच्या व्हायरल होत असलेल्या गाण्याचे नाव ‘रजाई में से ताकी’ असे आहे. हे गाणे ‘राजा बाबू’ या सिनेमातील आहे. निरहुआ आणि आम्रपाली यांच्या कोणत्याही गाण्याला प्रेक्षकांची जोरदार पसंती मिळत असते. ज्याप्रकारे आम्रपालीच्या डान्सवरून प्रेक्षकांच्या नजरा हटत नाहीत, त्याचप्रकारे निरहुआचे लक्षही फक्त आम्रपालीवरच असते. आम्रपालीचा जलवा इंटरनेटवर पाहायला मिळतोच. मात्र, निरहुआचाही चाहतावर्ग वाढतोय, यात तीळमात्र शंका नाही. निरहुआच्या चाहत्यांना त्याचा सिनेमा आणि त्याची गाणी खूपच आवडतात.
निरहुआचे कोणतेही गाणे प्रदर्शित होताच, ते सोशल मीडियावर व्हायरल होण्यास जास्त वेळ लागत नाही. निरहुआ जेव्हाही कोणते नवीन गाणे प्रदर्शित करतो, तेव्हा त्याचे चाहते क्षणातच त्याचे गाणे युट्यूबवर ट्रेंड करूनच सोडतात. अशात निरहुआ आणि आम्रपाली यांचे ‘रजाई में से ताकी’ हे गाणे युट्यूबवर चांगलाच धुमाकूळ करत आहे. निरहुआ आणि आम्रपाली यांना रोमान्स करताना पाहून चाहत्यांना त्यावरून नजर हटवणे कठीण होत आहे. व्हेव म्युझिक भोजपुरी या युट्यूब चॅनेलवर ६ एप्रिल, २०१७ रोजी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला २ कोटी ५८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, ३८ हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत.
गाणे बनवण्यासाठी यांनी घेतली मेहनत
कल्पना आणि छोटे बाबा यांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे. आझाद सिंग यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तसेच, छोटे बाबा यांनीच या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-