वस्तू चोरी होण्याचा त्रास फक्त सामान्य लोकांनाच नाही, तर मोठमोठ्या कलाकारांनाही होतो. मागील काही दिवसांपूर्वी अभिनेते अन्नू कपूर यांचे परदेशात गेल्यानंतर विमानतळावर पाकीट आणि महत्त्वाच्या गोष्टी चोरीला गेल्या होत्या. आता असेच काहीसे भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे हिच्यासोबतही घडले आहे. आम्रपाली दुबेचे सामान चोरीला गेले. हाती आलेल्या वृत्तानुसार, अयोध्यामध्ये पोहोचलेल्या आम्रपाली दुबेसोबत हा प्रकार घडला.
अभिनेत्री आम्रपाली दुबे (Amrapali Dubey) अयोध्यामध्ये तिच्या एका सिनेमाच्या शूटिंगसाठी पोहोचली होती. याचदरम्यान हॉटेलच्या खोलीतून तिचा मोबाईल फोन आणि दागिण्यांसह महागड्या वस्तू चोरी झाल्या. आम्रपालीने या घटनेनंतर तक्रार दाखल केली आहे.
अभिनेत्रीचे सामान चोरी झाल्याने हॉटेलात माजली खळबळ
हाती आलेल्या वृत्तांनुसार, आम्रपाली दुबेचे दागिणे आणि मोबाईल गुरुवारी (दि. 1 डिसेंबर) शान-ए-अवध येथून चोरी झाले. याच हॉटेलमध्ये अभिनेत्री थांबली होती. बुधवारी (दि. 30 नोव्हेंबर) अयोध्या धाममध्ये शूटिंग केल्यानंतर ती हॉटेलमध्ये आली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी अभिनेत्रीने सांगितले की, तिच्या खोलीतून 3 मोबाईल, अंगठ्या आणि इतर दागिणे गायब आहेत. आम्रपालीचे सामान चोरी झाल्याने हॉटेलात खळबळ माजली. त्यानंतर तातडीने पोलिसांना कळवण्यात आले आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
View this post on Instagram
सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांकडून तपासणी
दुसरीकडे, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास सुरू केला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तसेच, ते चोराचा शोध घेत आहेत. असे म्हटले जात आहे की, तपासात पोलिसांना एक संशयित सापडला आहे. सध्या पोलीस पाळत पथकाच्या माध्यमातून त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी सांगितले आहे की, आरोपीला लवकरच अटक केली जाईल.
सीओ शैलेंद्र सिंग यांनी सांगितले आहे की, ज्या संशयिताने चोरी केली आहे, तो सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तो अभिनेत्रीच्या खोलीव्यतिरिक्त इतर खोलीतही घुसला होता. सध्या पोलीस त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. (bhojpuri actress amrapali dubey jewellery mobile missing read more)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
ब्रेकिंग! साऊथ इंडस्ट्रीतील दिग्गज निर्माता हरपला, कमल हासनही हळहळले
‘व्हायरस’ तर कधी खडूस ‘प्राचार्य’ बनून केलं मनोरंजन, ‘या’ आहेत बोमन इराणींच्या लोकप्रिय भूमिका