Friday, March 29, 2024

साऊथ इंडस्ट्रीतील दिग्गज निर्माता हरपला, कमल हासनही हळहळले

साऊथ इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध निर्माते के मुरलीधरन यांचे गुरुवारी (दि. 01 डिसेंबर) निधन झाले. तमिळनाडूच्या कुंभकोणम येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. हदयविकाराच्या झटक्यामुळे जगाचा निरोप घेतल्याचे वृत्त आहे. त्यांच्या निधनामुळे साऊथ इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर दिग्गज अभिनेते कमल हासन यांनी शोक व्यक्त केले आहे. खरं तर, के मुरलीधरन हे तमिळ निर्माता परिषदेचे माजी अध्यक्षही होते.

त्यांचे भागीदार, दिवंगत व्ही स्वामीनाथन आणि जी वेणुगोपाल यांच्या सहकार्याने, के मुरलीधरन (K Muralidharan) यांनी लक्ष्मी मूव्ही मेकर्स हे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले होते. याच बॅनरखाली त्यांनी ‘आंबे शिवम’, ‘पुधूपेट्टाई’ आणि ‘बागवथी’ यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले.

कमल यांचे ट्वीट
दिग्गज अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी तमिळमध्ये ट्वीट केले. त्यात ते म्हणाले की, “अनेक हिट चित्रपट देणारे लक्ष्मी मूव्ही मेकर्सचे निर्माते के आता नाहीत. प्रिय शिवा, मला ते दिवस आठवतात. त्यांना श्रद्धांजली.”

सन 2015मध्ये प्रदर्शित झालेला ‘सकलाकला वल्लवन’ (Sakalakala Vallavan) हा लक्ष्मी मूव्ही मेकर्स निर्मित शेवटचा चित्रपट होता. या सिनेमात जयम रवी, त्रिशा आणि अंजली यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. (producer K Muralidharan passes away actor Kamal Haasan pays heartfelt tribute)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘व्हायरस’ तर कधी खडूस ‘प्राचार्य’ बनून केलं मनोरंजन, ‘या’ आहेत बोमन इराणींच्या लोकप्रिय भूमिका
अभिनेत्री स्वरा भास्करचे भारत जाेडाे यात्राला सर्मथन; भाजप म्हणतंय, ‘देशविरोधी मानसिकतेचे…’

हे देखील वाचा