Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

भोजपुरी अभिनेत्रीलाही नाही आवरला मोह, थेट नेहा कक्करच्या ‘या’ गाण्यावर धरला ठेका

मंडळी मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये म्हणजेच महिन्याभरापूर्वी प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर ही गरोदर असल्याची बातमी समोर आली होती. परंतु दोनच दिवसात ती तिच्या ‘ख्याल रख्या कर’ या गाण्याचं प्रमोशन करत होती हे पुढे आलं. परंतु नेहाच्या प्रमोशनच्या अजब फंड्यामुळे तिच्यावर अनेकांनी टीकाही केली होती तर काही जण तिच्या समर्थनात बोलत होते. हे गाणं अखेर प्रदर्शित झालं आणि याला लाखोंमध्ये व्ह्यूज देखील आले. अनेकांनी यावर शॉर्ट व्हिडिओज बनवणं देखील पसंत केलं. यामध्ये कलाकारही मागे कसे राहतील.

भोजपुरी सिनेमाची लोकप्रिय अभिनेत्री अंजना सिंहने गायिका नेहा कक्करच्या नुकत्याच आलेल्या ‘ख्याल रख्या कर’ गाण्यावर डांस केला आहे, जो जोरदार व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर अंजनाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती ‘ख्याल रख्या कर’ गाण्यावर नाचताना दिसली आहे. या व्हिडिओमध्ये तिने ऑरेंज कलरचा लेहेंगा आणि दागिने परिधान केले आहेत. ही व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिलं आहे की, ‘स्वतःची काळजी घ्या.’

अंजना सिंह भोजपुरी चित्रपटसृष्टीतली एक मोठी अभिनेत्री आहे आणि तिने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. हल्ली ती उत्तर प्रदेशमध्ये असून एका भोजपुरी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

अंजना सिंह ‘कसम पैदा करनेवाले की २’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात यश कुमार आणि निधी झा देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय श्रीवास्तव करीत आहेत. देव सिंह आणि संजय श्रीवास्तव देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत. याशिवाय अंजना सिंह दिनेश लाल यादव आणि आम्रपाली दुबे यांच्या ‘निरहुआ द लीडर’ चित्रपटातही झळकणार आहे.

भोजपुरी गायक आणि अभिनेते रितेश पांडे आणि अंजना सिंह नुकतेच ‘चुनरी झलका २’ मध्ये दिसले होते. त्यापूर्वी या दोघांनीही अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. अंजनाने इन्स्टाग्रामवर या गाण्याचे टीझरही शेअर केले होते.

हे देखील वाचा