Friday, July 5, 2024

भोजपुरी अभिनेत्री असलेल्या मोनालिसाने भर उन्हाळ्यात वाढवले सोशल मीडियाचे तापमान, शेअर केले बोल्ड बिकिनी फोटो

भोजपुरी इंडस्ट्रीमधील सर्वात ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून मोनालिसा ओळखली जाते. तिने तिच्या हिंमतीवर भोजपुरीसोबतच हिंदी टेलिव्हिजनविश्वात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. मोनालिसा तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे देखील नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असणारी मोनालिसा सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करत असते. मोनालिसाच्या बिकिनी फोटो तर नेहमीच तुफान व्हायरल होत असतात.

नुकतेच मोनालिसाच्या तिचे काही बिकिनीमधील बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असून, व्हायरल होत आहे. मोनालिसाच्या शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाची फॉरेस्ट प्रिंट बिकिनी घातली असून, यावर तिने हेव्ही मेकअप करत भडक लाल लिपस्टिक आणि पोनीटेल घालून लूक कम्प्लिट केला आहे. या फोटोंमधून तिचा कमनीय आणि आकर्षक बांधा सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून, तिच्या या बांध्याचा हेवा सगळ्यांना वाटत आहे.

मोनालिसाने हे फोटो काही दिवसांपूर्वी शेअर केले होते. मात्र आता पुन्हा एकदा तिने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “जेव्हा आठवणी तुम्हाला त्रास देतात.” यासोबतच तिने ‘थ्रोबॅक’ हा हॅशटॅग देखील वापरला आहे. यासोबतच तिने ‘टेक मी बॅक’ असे देखील लिहिले आहे. मोनालिसा नेहमीच तिच्या सोशल मीडियावरील बोल्ड फोटोजमुळे गाजताना दिसते. तिचे फोटो तिला अमाप प्रसिद्धी देत लाइमलाइट देखील मिळवून देतात. लवकरच मोनालिसा तिचे ओटीटी पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.

हंगामा प्लेवर ती लवकरच ‘धप्पा’ या सिरीजमधून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या सिरीजमध्ये तिच्यासोबत अभिनेता जय भानुशाली देखील दिसणार आहे. मोनालिसा तिच्या रील्समुळे देखील गाजत असते. तिचे नवनवीन रील नेहमीच व्हायरल होताना दिसतात. भोजपुरीमध्ये सुपरस्टार बिरुद मिळवणाऱ्या मोनालिसाने टीव्हीवर ‘नजर’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. बिग बॉसने तिला अमाप फेम आणि नेम मिळवून दिले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा