Friday, December 5, 2025
Home भोजपूरी मोनालिसाने बीचवर दाखवला तिचा हॉट अंदाज, डीप नेक वनपीसमध्ये दिसतेय खूपच सुंदर

मोनालिसाने बीचवर दाखवला तिचा हॉट अंदाज, डीप नेक वनपीसमध्ये दिसतेय खूपच सुंदर

भोजपुरी सिनेमातील ग्लॅमरस अंदाजासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मोनालिसाला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिने आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर आपली छाप सोडली आहे. मोनालिसाने केवळ भोजपुरीमध्येच नाही, तर हिंदी टीव्ही शोमध्येही काम केलेे आहे . ‘नजर’ या मालिकेतील तिच्या व्यक्तिरेखेबद्दलही ती बरीच चर्चेत राहिली आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. मोनालिसा दररोज सोशल मीडियावर तिचे नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. सध्या मोनालिसा पती विक्रांत सिंग राजपूतसोबत मालदीवमध्ये वेळ घालवत आहे. मालदीवमधून मोनालिसा सतत तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे. याच दरम्यान मोनालिसाचे अनेक नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

मोनालिसाने तिचे काही फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये पोझ दिली आहे. त्याचबरोबर या ड्रेससोबत तिने मॅचिंग ग्लासेसही घातले आहेत. तर केसांच्या दोन वेण्या घातल्या आहेत. या तिच्या हटके लूकने चाहत्यांना वेड लावले आहे. तसेच या फोटोमध्ये मोनालिसाच्या मागे समुद्र स्पष्टपणे दिसत आहे. तिचे हे फोटो आतापर्यंत ६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. (Kina sona tujhe rab ne Banaya! Fans went crazy after seeing the photos of actress Mona Lisa)

अलीकडेच मोनालिसाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर मालदीवमधील तिच्या पतीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती पती विक्रांत सिंग राजपूतसोबत पाण्यामध्ये एन्जॉय करताना दिसून आली. फोटोमध्ये असे ही दिसून येत आहे की, मोनालिसा ज्या रेस्टॉरंटमध्ये आहे ते पाण्याच्या मध्यभागी बांधलेले आहे. त्याचबरोबर मोनालिसा विक्रांतसोबत वेगवेगळ्या पोझही देताना दिसत आहे. याच दरम्यान मोनालिसाने ब्लॅक अँड व्हाईट वन पीस घातला होता, ज्यात अभिनेत्री खूप सुंदर दिसत होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इथे सूर्यप्रकाश येतोय…’, म्हणत अनन्या पांडेने शेअर केले घायाळ करणारे ‘ब्लॅक ऍंड व्हाईट’ फोटोशूट

-कंगनासोबत ब्रेकअपनंतर तुटून गेला होता अध्ययन; वडील शेखर यांच्या ‘या’ सल्ल्याने दिली त्याला हिंमत

निर्मात्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप; तर पत्रिका वाटप होऊनही ‘या’ कारणामुळे मोडले होते शिल्पाचे लग्न

हे देखील वाचा