Tuesday, October 14, 2025
Home भोजपूरी नाईट ड्रेसमधील मोनालिसाचा फोटो वेधतोय नेटकऱ्यांचे लक्ष, चाहता म्हणाला, ‘यात तू खूपच सुंदर आणि…’

नाईट ड्रेसमधील मोनालिसाचा फोटो वेधतोय नेटकऱ्यांचे लक्ष, चाहता म्हणाला, ‘यात तू खूपच सुंदर आणि…’

भोजपुरी चित्रपटसृष्टीमध्ये जेव्हा जेव्हा सुंदर अभिनेत्रींचा उल्लेख होतो, तेव्हा अभिनेत्री मोनालीसाचे नाव सगळ्यात टॉपच्या अभिनेत्रींमध्ये असते. मोनालिसाची गणना भोजपुरी चित्रपटसृष्टीमधील सगळ्यात सुंदर अभिनेत्रींमध्ये होते. ती तिचे अनेक वेगवेगळे फोटो शेअर करून तिच्या सौंदर्याचे दर्शन प्रेक्षकांना देत असते. अनेक भोजपुरी चित्रपटात काम केल्यानंतर मोनालिसा आता टेलिव्हिजनवर काम करू लागली आहे. तिने टेलिव्हिजन दुनियेत देखील वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाचे सगळे दीवाने आहेत, पण त्यासोबत ती चर्चेत असते, तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मोनालिसाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. तिने तिच्या बेडरूममधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने स्लीव्हलेस नाईट ड्रेस आणि शॉर्ट्स घातले आहेत. या फोटोमध्ये ती आळस देताना दिसत आहे. तिचा हा क्यूट फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तिचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत. एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “यात तू खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.” (Bhojpuri actress Monalisa shared night dress photo on social media)

मोनालिसाने शेअर केलेल्या या फोटोला आतापर्यंत ५७ हजारांपेक्षाही जास्त लाईक्स आले आहे. या आधी तिने पूजा बॅनर्जी आणि कुणाल यांच्या लग्नातील काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती गोव्यात एन्जॉय करत होती.

मोनालिसा ही ‘बिग बॉस १०’ ची स्पर्धक होती, तेव्हा तिने तिचा बॉयफ्रेंड विक्रांत सिंग राजपूत याच्याशी २०१७ मध्ये बिग बॉसमध्येच लग्न केले होते. त्यावेळी देखील ती खूपच चर्चेत होती. तिने ‘ब्लॅकमेल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिने ‘नजर’ आणि ‘नजर २’ या मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोकळे केस अन् न्यूड मेकअपमध्ये उर्फी दिसतेय एकदम स्टनिंग, तुम्ही पाहिला का फोटो?

-जाळ अन् धूर संगटच! नोराच्या ग्लॅमरस फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग, पडतोय लाईक्सचा पाऊस

-स्वत:चा जुना फोटो शेअर करत अनुपम यांनी नेटकऱ्यांना विचारला ‘हा’ प्रश्न, चाहते म्हणाले…

हे देखील वाचा