भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा तिच्या बोल्ड स्टाईलमुळे खूप लोकप्रिय झाली आहे. आपल्या हॉट लूकमुळे ती चाहत्यांच्या मनावर राज्य करते. आता अलीकडेच मोनालिसाने एक फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काळ्या आणि करड्या रंगाच्या आउटफिट्समध्ये मोनालिसाचा हा लूक अगदी आकर्षक दिसत आहे. यासह तिचे चांदीचे दागिने तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत.
तसेच, या पारंपारिक लूकलाही मोनालिसाने बर्यापैकी हॉट केले आहे. तिने हे फोटो शेअर करत म्हटले की, तिचा हा लूक खास कलर्स होळी इव्हेंटचा आहे. मोनालिसाच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलेब्रिटींनीही तिचे कौतुक केले आहे. चाहते कमेंट करून म्हणत आहेत की, तिच्या या फोटोंमुळे सोशल मीडियाचा पारा वाढला आहे.
मोनालिसाने केवळ भोजपुरीतच नव्हे तर हिंदी, बंगाली, तेलुगु, तमिळ, कन्नड आणि उडिया सिनेमातही काम केले आहे. याशिवाय ती टीव्हीवरही धमाल करत आहे. काम करत असतानाच तिने उडिया व्हिडिओंमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे.
मोनालिसाने ‘ब्लॅकमेल’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने सुनील शेट्टी आणि अजय देवगणसोबत काम केले. पुढे बिग बॉसचा भाग झाल्यानंतर ती बरीच लोकप्रिय झाली. बिग बॉसमध्ये लोकांची नाती तुटतात, अशा नॅशनल टीव्हीवर मोनालिसाचे लग्न झाले. तिने बिग बॉसच्या घरात विक्रांतशी लग्न केले होते.
फॅमिली प्लॅनिंग करत आहे मोनालिसा
काही दिवसांपूर्वी मोनालिसाने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, आता तिला फॅमिली प्लॅन करायची आहे. तिला आणि विक्रांतला आता त्यांच्या आयुष्यात छोट्या पाहुण्याला आणायचे आहे, ज्याची प्लॅनिंग त्यांनी केली आहे. अशा परिस्थितीत, आता हे जोडपे पुढच्या वर्षापर्यंत त्यांच्या चाहत्यांना गोड बातमी देऊ शकतात.
मोनालिसा म्हणाली होती की, “आम्ही लवकरच बाळासाठी प्लॅन करत आहोत. याबद्दल लवकरच माहिती मिळेल. माझ्या व विक्रांतच्या कुटुंबाकडून आमच्यावर पालक बनण्यासाठी खूप दबाव आहे. कदाचित पुढच्या वर्षी आम्ही पालक होऊ.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भोजपुरी होळीगीतांची धमाल कायम! ‘निरहुआ’चं नवीन गाणं जबरदस्त व्हायरल