होळीचा सण येण्यापूर्वीच भोजपुरी चित्रपटसृष्टीमध्ये होळीचे वातावरण बनले आहे. सध्या भोजपुरी सिनेमांशी संबंधित सर्व कलाकार एकामागोमाग एक अशी होळीची गाणी रिलीज करताना दिसत आहेत. नुकतेच भोजपुरी सुपरस्टार दिनेश लाल यादव ‘निरहुआ’ यानेही होळीचे जबरदस्त गाणे रिलीज केले आहे. या गाण्याचे बोल आहेत, “गोड लागी पहुना.”
या भोजपुरी होळीगीताला वर्ल्डवाइड रेकॉर्ड्स भोजपुरीने त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर रिलीज केले आहे. हे गाणे ‘धोबी’ या गाण्याच्या संबंधित आहे, ज्यामध्ये निरहुआसोबत अंजली उर्वशीने आवाज दिला आहे.
दिनेश लाल यादव निरहुआ याने या गाण्याच्या पारंपारिक स्टाईलने आपल्या चाहत्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला आहे. हे गाणे खूपच शानदार आहे. या गाण्याचे बोल राणा सिंग आणि विमल बावरा यांनी लिहिले आहेत, तर संगीत महिपाल भारद्वाज यांचे आहे.
हे संपूर्ण गाणे, होळीच्या वेळी होत असलेल्या दाजी-मेव्हणीच्या मस्तीवर चित्रित करण्यात आले आहे. अगदी देसी स्टाईलमध्ये गायलेले हे गाणे संगीत रसिकांचे खूप मनोरंजन करत आहे.
निरहुआच्या या गाण्याला 6 लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले असून काही तासांतच यूट्यूबवर 30 हजारांहून अधिक प्रेक्षकांनी लाईक केले आहे. यासह सुमारे 1 हजार कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत. यापूर्वी निरहुआची ‘बुरा न मानो होली है 2’ गाणे आले होते. जे खूप व्हायरल झाले. हे गाणे ही लोकांना खूप आवडले होते.
सन 2007 मध्ये “चलत मुसाफिर मोह लियो रे” या कल्पना पटवारी आणि सुनील बिहारी यांच्या चित्रपटात, सहाय्यक अभिनेत्याच्या रूपात निरहुआने आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. यानंतर त्याचे बरेच चित्रपट रिलीज झाले. पुढे 2012 मध्ये त्याने ‘गंगा देवी’ या भोजपुरी चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतही काम केले. 2016 मध्ये भोजपुरी चित्रपटातील योगदानाबद्दल त्याला उत्तर प्रदेशच्या ‘यश भारती सन्मान पुरस्कार’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात आले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बापरे! प्रीति झिंटाला किस करणे रितेशला पडले भलतेच महागात, जेनेलियाने केली चांगलीच धुलाई
-अक्षरा सिंगच्या ‘पगली बुलावे’ गाण्याची यूट्यूबवर जोरदार एंट्री! पुन्हा लावले चाहत्यांना वेड