Thursday, April 24, 2025
Home भोजपूरी माधुरी दीक्षितच्या ‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावर भोजपुरी अभिनेत्री निधी झाने धरला ठेका

माधुरी दीक्षितच्या ‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावर भोजपुरी अभिनेत्री निधी झाने धरला ठेका

कलाकार सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठी सतत काही ना काही पोस्ट करताना दिसतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे ते फॅन्सच्या संपर्कात तर राहतात सोबतच मीडियामध्ये देखील ते तुफान गाजतात. सध्या भोजपुरी अभिनेत्री तुफान गाजताना दिसत आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या मोठा बोलबाला दिसतो. अशातच अभिनेत्री निधी झाने (Nidhi Jha) तिचा एक डान्स व्हिडिओ देखील मोठा व्हायरल होत आहे. निधी भोजपुरी इंडस्ट्रीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सामील होते. तिने तिच्या सौंदर्याने, डान्सने आणि अभिनयाने लोकांना अक्षरशः वेड लावले आहे. सध्या निधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

भोजपुरी अभिनेत्री निधी झा सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. व्यस्त वेळापत्रकातूनही ती सोशल मीडिया पोस्टसाठी वेळ काढते. निधीने इंस्टाग्रामवर तिचा एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये ती खूपच उदास दिसत असून, हा व्हिडिओ तिचा एक रील व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये निधीने फ्लॉवर प्रिंटेड घागरा आणि चोळी घालून एकदम देसी अवतारात अतिशय सुंदर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने माधुरी दीक्षितचे आयकॉनिक गाणे असलेल्या ‘चोली के पीछे’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

केसांमध्ये लाल गुलाब लावून नाचणाऱ्या निधीच्या अदा तिच्या फॅन्सला वेडे करत आहे. ‘चोली के पीछे’ गाण्यावरील तिच्या डान्स स्टेप्स देखील कमालीच्या सुंदर आहेत. हा व्हिडिओ पाहून तिचे फॅन्स देखील तिचे कौतुक करताना थकत नाही. आतापर्यंत या व्हिडिओला हजारो लाईक्स आले असून, तेवढ्याच कमेंट्स देखील आल्या आहेत. याआधी निधीने ‘क्योंकि इतना प्यार तुमको’ या गाण्यावर तिचा एक व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान गाजला. निधीने भोजपुरी स्टार असणाऱ्या यश कुमारसोबत साखरपुडा केला असून याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा