भोजपुरी सिनेमातील ‘बार्बी डॉल’ नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री प्राची सिंगचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. ती बर्याचदा सोशल मीडियावर तिचे पोस्ट्स शेअर करत असते आणि तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहते. नेहमीप्रमाणेच तिच्या लेटेस्ट व्हिडिओलाही चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती माधुरी दीक्षित आणि अक्षय कुमारच्या ‘अब तेरे दिल में हम आ गये’ या गाण्यावर अभिनय करत एक्सप्रेशन्स देताना दिसली.
व्हिडिओमध्ये प्राचीने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे, ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ आता इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे. तिने केवळ तिच्या डान्स मुव्हजद्वारे लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आजकाल ती सोशल मीडिया युजर्सला तिच्या मनमोहक एक्सप्रेशन्सने वेड लावत आहे. याव्यतिरिक्त हे गाणे ‘आरझू’ चित्रपटातील आहे. या गाण्यातील माधुरीच्या डान्स आणि अभिनयाला कोणीच विसरू शकत नाही. अशा परिस्थितीत या गाण्यावरील प्राचीचा अभिनयही सर्वांचे लक्ष वेधत आहे.
प्राची तिच्या सोशल मीडिया हँडलवर बर्याचदा पोस्ट अपलोड करत असते. काही दिवसांपूर्वीच प्राचीने दक्षिण भारतीय स्टाईलमध्ये ‘नाक्का-मुक्का’ आणि ऐश्वर्या रायच्या ‘अच्छी लगती हो’ या गाण्यावरही जबरदस्त डान्स मुव्हज दाखवले होते. ज्याला चाहत्यांनी खूप पसंतही केले.
प्राची लवकरच किशन रायसोबत ‘मेरे प्यार से मिला दे’ चित्रपटात मध्ये दिसणार आहे. यात अनूप अरोरा, लोटा तिवारी, संचिता बॅनर्जी आणि आशी तिवारी असे कलाकारही पाहायला मिळतील. यासह ती ‘पांच मेहरिया’ या कौटुंबिक ड्रामामध्ये दिसणार आहे. यामध्ये प्रियांका पंडित, निशा दुबे, कनक पांडे, संचिता बॅनर्जी आणि किशन रायदेखील दिसणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खेसारी लाल यादवच्या ‘पड़ोसन शोषण करती है’ गाण्याचा यूट्यूबवर राडा! पार केला २८ लाख व्ह्यूजचा टप्पा
-थ्रोबॅक व्हिडिओ शेअर करत अनुष्काने सांगितल्या मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या आठवणी