Monday, July 8, 2024

बापरे! 46 वर्षीय अभिनेत्यासाेबत राेमान्स करताना दिसली 28 वर्षीय अभिनेत्री; म्हणाली, ‘ये दिल तुम बिन…’

भोजपुरी अभिनेत्री झोया खान गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता राहुल जगतापसोबत अनेक रोमँटिक व्हिडिओ शेअर करत आहे. एकदा तर त्यांचे रोमान्सने भरलेले सर्व रील समोर आले हाेते, ज्यामध्ये हे जोडपे एकमेकांचे हात पकडताना दिसले हाेते. राहुलसोबत झोयाचेही स्टाईल अप्रतिम आहे आणि यासोबतच तिचे हावभावही पाहण्यासारखे असतात. काहींना दोघांचे रील आवडले तर काही त्यांना ट्रोलही करत आहेत.

नुकताच झाेया खान (Zoya Khan) आणि राहुल जगताप(Rahul Jagtap) यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते दोघे लगा मंगेशकर यांच्या ‘ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं’ या गाण्यावर अभिनय करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, झोया आणि जगताप झुल्यावर झुलताना दिसत आहेत आणि यामध्ये अभिनेत्री तिच्या सहकलाकारासह रोमँटिक हाेत आहे.

अभिनेत्री राहुलला प्रेमाने कुरवाळत आहे आणि तिचा सहकलाकार देखील तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत आहे. व्हिडिओमध्ये एका यूजरने कमेंट करत लिहिले की, “ही मुलगी तुला शोभत नाही…” तर दुसऱ्याने लिहिले की, ”शाेभत नाही त्याला आम्ही काय करायच”, काेणी व्हाईट टायगर म्हणुन संबाेधले आहे तर काेणी दादा म्हंटले आहे. एक चाहता म्हणाला “Old Is Gold..”

इंस्टाग्राम रीलमध्ये 28 वर्षीय झोया खान तिचा 46 वर्षीय को-स्टार राहुल जगतापच्या प्रेमात वेडी झालेली दिसत आहे. याआधी दोघेही काही रोमँटिक व्हिडिओंमध्ये दिसले होते. दाेघांनी रोमँटिक रील बनवण्याची सुरुवात केकेचे प्रसिद्ध गाणे ‘आँखों में तेरी अजब अजब सी अदां है’ या गाण्यावर केली हाेती. नृत्य आणि अभिनयाव्यतिरिक्त, झोया सोशल मीडियावरील फार सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि रील्समधून चाहत्यांचे लक्ष वेधते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
खास क्षण! वैवाहिक आयुष्यात चांगलीच रमलीये काजल, साजरा केला लग्नानंतरचा दुसरा करवा चाैथ

विराट कोहलीने खरेदी केला किशोरदांचा बंगला! दिल्लीनंतर मुंबईत सुरू करणार ‘हा’ बिझनेस

हे देखील वाचा