खान कुटुंबाचा ‘हा’ फोटो पाहून तुमचीही छाती अभिमानाने फुगेल, तिरंग्याला सलाम करताना दिसला ‘पठाण’

‘किंग ऑफ रोमान्स’, ‘किंग खान’ अशा वेगवेगळ्या नावांनी सुपरस्टार शाहरुख खान ओळखला जातो. शाहरुख त्याच्या सिनेमांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगलाच चर्चेत असतो. त्याचा कोणताही सिनेमा आला, तरी चाहते त्याच्या सिनेमाला जोरदार पसंती दर्शवतात. नुकतेच ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शाहरुखने खूपच सुंदर फोटो काढले आहेत. या फोटोंमध्ये त्याचे संपूर्ण कुटुंब दिसत आहेत. शाहरुख सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानात सामील झाला आहे. अभिनेत्याने त्याच्या घरी म्हणजेच ‘मन्नत’ बंगल्यावर तिरंगा फडकवाला. शाहरुखची पत्नी गौरी खान हिने झेंड्यासोबत कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे.

तिरंग्यासोबत दिसले खान कुटुंब
जोरदार व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये शाहरुख खान (Shahrukh Khan) याचे संपूर्ण कुटुंब पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाच्या पँटमध्ये दिसत आहे. शाहरुखने अबरामचा हात पकडला आहे, तर आर्यनने स्टायलिश पोझ दिला आहे. त्यांच्या मागे झेंडा उंच हवेत दिसत आहे. गौरी खान (Gauri Khan) हिने फोटो शेअर करत लिहिले की, “स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!” शाहरुख आणि गौरीची मुलगी सुहाना खान या फोटोत दिसत नव्हती. ती सध्या झोया अख्तर हिच्या ‘द आर्चीज’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

मित्रांसोबत करतात पार्टी
नुकताच शाहरुख त्याच्या जुन्या मित्रांसोबत दिल्ली येथे पार्टी करताना दिसला. गौरीने पार्टीतील एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता. इंस्टाग्रामवर गौरीने पोस्ट शेअर केली होती. या पोस्टला कॅप्शन देत तिने लिहिले होते की, “दिल्लीला परत गेल्याने माझ्या आठवणी नेहमी ताज्या होतात… मित्र आणि कुटुंबियांसोबतची मजेदार संध्याकाळ.” फोटोत अभिनेता त्याच्या मित्रांसोबत आणि त्याच्या पत्नीसोबत उभा असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरुखचे आगामी सिनेमे
शाहरुखच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर तो सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘पठाण’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा २५ जानेवारी, २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. यासोबतच तो एटलीच्या ‘जवान’ या सिनेमातही दिसणार आहे. हा सिनेमा २ जून, २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. यासोबतच तो राजकुमार हिरानींच्या ‘डंकी’ सिनेमात तापसी पन्नू हिच्यासोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
आख्खा देश पाहतोय ‘पुष्पा २’ची वाट, पण ‘या’ बातमीने केला चाहत्यांचा मूड ऑफ; सुपरस्टार अभिनेता बाहेर
अगगं! फोटोग्राफरला थेट बाथरूममध्ये घेऊन गेली ‘ही’ अभिनेत्री, अंघोळ करतानाचे प्रायव्हेट फोटो व्हायरल
टायगर- दिशाच्या ब्रेकअपमागे ‘या’ अभिनेत्रीचा हात? जाणून घ्या खरं काय ते