Friday, July 5, 2024

प्रयाेग करावे, तरी किती! केसरिया गाण्याचं भाेजपुरी व्हर्जन रिलीज; चाहते म्हणाले, “केसरिया कधीच…”

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ चित्रपट रिलीज झाला असुन या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर शानदार कमाई केली आहे. या चित्रपटाची अनेक लाेक प्रशंसा करत हाेते. यामध्ये सर्व कलाकारांचा अभिनय अप्रतिम हाेता. या चित्रपटाच्या स्टाेरी व्यतिरिक्त गाणे केसरिया प्रचंड चर्चेत हाेते. हे गाणे साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत हाेते. चित्रपटाच्या रिलीजनंतर काही दिवसात नेटिजन्सने एक रील शेअर केला आहे. ज्याला केसरिया गाण्याचे भाेजपुरी व्हर्जन म्हणटले जात आहे. 

लाेकांच्या पसंतीस उतरलंय केसरिया भाेजपुरी व्हर्जन
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट वाराणसीच्या रस्त्यावर एकत्र नाचताना दिसले आहेत आणि आता कोणीतरी पवन सिंगच्या भोजपुरी हिट ‘लॉलीपॉप लागेलू’ सोबत त्यांच्या डान्स स्टेप्स सिंक केल्या आहेत आणि ते अगदी परफेक्ट दिसत आहे. या डान्स स्टेप्स 2008 मध्ये आलेल्या भोजपुरी गाण्याशी सुसंगत वाटतात. व्हिडिओवर एका युजरने हसणाऱ्या इमोजीसह लिहिले की, “केसरिया कधीच एकसारखे होणार नाही..” तर एकाने कमेंटमध्ये लिहिले की, “मी केशरिया गाणे पाहिले नाही पण हे गाणे ओरिजिनल आहे असे मला वाटले.”

केशरिया गाणे दिल डूबाच्या डान्स स्टेप्सशीहि जुळते
अशाच एका व्हिडिओमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट 2004 मध्ये आलेल्या ‘खाकी’ चित्रपटातील ‘दिल डूबा’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत. ‘केसरिया’च्या डान्स स्टेप्स ‘दिल दूबा’च्या गाण्यांसारख्या आहेत. हे गाणे हिंदीत अरिजित सिंगने गायले आहे आणि तेलुगूमध्ये श्रीवल्ली फेम सिड श्रीरामने गायले आहे. गाण्यांव्यतिरिक्त अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवले आहे. आलिया भट्ट लवकरच आगामी गॅल गॅडोट स्टारर ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती करण जोहरच्या ‘रॉम-कॉम रॉकी की रानी की प्रेम कहानी’च्या रिलीजसाठी देखील उत्सुक आहे, ज्यामध्ये ती रणवीर सिंगसाेबत दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’मध्ये अर्जुन कपूर खलनायक होणार का? निर्मात्याचे ‘हे’ विधान आलं समोर
‘माझी भूमिका तू साकारणार म्हणजे…’; सुष्मिता सेनच्या भूमिकेबद्दल गौरी सावंतने केली पोस्ट शेअर

हे देखील वाचा