Friday, February 3, 2023

कंगनाने ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईवर उपस्थित केले प्रश्न; चोख प्रत्युत्तर देत मौनीने केली बोलती बंद

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन – शिवा‘ या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. रणबीर कपूर, शाहरुख खान, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि नागार्जुन यांसारख्या सुपरस्टार्सचा समावेश असलेल्या या चित्रपटाने जगभरात धमाकेदार कमाई केली आहे. चित्रपटाने 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटातील मौनीच्या दमदार अभिनयाचेही कौतुक होत आहे. टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत प्रवास करणारी मौनी सध्या चर्चेत आली आहे. तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगना राणौत हिला ‘ब्रह्मास्त्र’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत विचारलेल्या प्रश्नाचे चोख उत्तर दिले आहे.

मुलाखतीदरम्यान मौनी रॉय (Mouni Roy) हिला विचारण्यात आले की, ‘ब्रह्मास्त्र चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन खोटे असल्याचे कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने म्हटलं होतं. यावर मौनीनं सुरुवातीला टाळण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, “आपण नकारात्मक गोष्टींवर बाेलायला नको.”

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

‘ब्रह्मास्त्र’मध्ये मौनी रॉयने ‘जुनून’ची भूमिका साकारली आहे. मौनीने या भूमिकेत अप्रतिम अभिनय केला आहे. तिचा लूकही चाहत्यांना आवडला आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काहींना हा चित्रपट आवडला आहे, तर काही युजर अनेक कारणांनी चित्रपटावर निशाणा साधत आहेत.

काही लोकांना चित्रपटाची स्टाेरी दमदार वाटली, तर काहींनी चित्रपटाच्या कमाईवरही प्रश्न उपस्थित केला आहे. अभिनेत्री कंगना राणौतनेही ब्रह्मास्त्र रिलीज झाल्यापासून सातत्यानं त्याच्या विराेधात बाेलत आहे. कंगनाने चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन खोटे असल्याचे म्हटले हाेते. तिने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून चित्रपटाचा निर्माता करण जोहरवर टीका केली हाेती. तिने विचारले, “‘द कश्मीर फाईल्स’ हा हिंदू नरसंहारावरचा 10 कोटींचा चित्रपट आजही कमाईत आघाडीवर आहे आणि आता माफिया मंत्र्यांनुसार, करण जोहरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाने याला मागे टाकले आहे… करण जोहर जी आप क्या चीज हो यार!'”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

‘ब्रह्मास्त्र’ने बॉक्स ऑफिसवर जगभरात 360 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटात माैनी राॅय व्यतिरिक्त मेगास्टार अमिताभ बच्चन आणि नागार्जुन अक्किनेनीदेखील आहेत. ‘ब्रह्मास्त्र’चा पहिला भाग हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘नेहा कक्करला 8 वर्षांसाठी तुरुंगात डांबा’, गायिका का होतेय ट्रोल? कारण घ्या जाणून
पत्रकार विचारत होता प्रश्न, तेवढ्यात अचानक रागाने ओरडला सनी देओल; उपस्थितांमध्ये पसरली भयान शांतता
‘माझ्या गाडीचा ब्रेक फेल केला, विष देऊन मारण्याचाही प्रयत्न झाला…’ अभिनेत्री तनुश्री दत्ताचा खळबळजनक खुलासा

हे देखील वाचा