आम्रपाली दुबेच्या भोजपुरी गाण्याची इंटरनेटवर हवा, आठवड्यातच केला युट्यूबवर नवा विक्रम


भोजपुरी चित्रपटांमध्ये मागील काही दिवसांपासून खूप मोठे बदल घडत आहे. एकीकडे भोजपुरी चित्रपटाचे, गाण्यांचे शूटिंग परदेशात सुरु झाले आहे तर, तर दुसरीकडे भोजपुरी गाण्यांना आणि कलाकारांना प्रचंड मोठी लोकप्रियता मिळत आहे. भोजपुरी भाषेत अनेक चित्रपट डब देखील होत आहे. याच कारणांमुळे आता तर नेहमीच भोजपुरी गाणे ट्रेण्डिंगमध्ये असतात. या गाण्यांना त्यांच्या आगळ्या वेगळ्या शब्दांमुळे, डान्समुळे सुद्धा भरपूर लोकप्रियता मिळते.

सध्या असेच एक भोजपुरी गाणे जबरदस्त गाजत आहे. हे गाणे आहे ‘तू बनबू लल्लू की लैला’. या गाण्यात भोजपुरी सुपरस्टार दिनेश लाल यादव निरहुआ अभिनेत्री आम्रपाली दुबेसोबत धमाकेदार डान्स करताना दिसत आहे.

निरहुआ आणि आम्रपाली यांचे हे गाणे आताच प्रदर्शित झाले असून या गाण्याला खूपच कमी कालावधीत लाखो हिट्स मिळाले आहेत. यासोबतच हे गाणे सुपरहिट गाण्यांच्या यादीत सामील झाले आहे. या दोघांची जवळपास सर्वच गाणी हिट होत असतात.

दिनेश लाल यादव आणि आम्रपाली दुबे यांनी याआधीही अनेक जबरदस्त हिट गाणे दिले आहेत. या गाण्याला दिनेश आणि आम्रपाली यांच्या डान्स आणि रोमान्सने सुपरहिट बनवले आहेत. अजूनही हे गाणे ट्रेण्डिंगमध्ये टॉपवर आहे.

 


Leave A Reply

Your email address will not be published.