बॉलिवूड स्टार्सप्रमाणेच आता भोजपुरी स्टार्सही त्यांच्या लग्नाची बातमी कोणाला कळू देत नाहीत. गुरुवारी (दि. 26 जानेवारी)ला भोजपुरी स्टार अरविंद अकेला कल्लू बनारसमध्ये लग्न करत आहे, त्याच्या लग्नात त्याने भोजपुरी सिनेमाशी संबंधित काही खास लोकांना आमंत्रित केले आहे, परंतु सर्वांना विनंती केली आहे की त्याच्या लग्नाची बातमी कुठेही लीक होऊ नये. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने त्यांचे लग्न होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद अकेला कल्लू (arvind akela kallu) याचे बनारसची रहिवासी शिवानी पांडे हिच्याशी लग्न होत असून हे लग्न दोन्ही घरच्यांच्या इच्छेने होत आहे. या लग्नापूर्वी अरविंद अकेला कल्लू भोजपुरी चित्रपटसृष्टीशी संबंधित अभिनेत्रीसोबत लग्न करणार असल्याची चर्चा अनेकवेळा झाली आहे. अनेक अभिनेत्रींसाेबतच्या त्याच्या अफेअरच्या बातम्याही उडाल्या, पण अरविंद अकेला कल्लूने नेहमीच अशा बातम्या केवळ अफवा असल्याचे सांगितले. जेव्हा-जेव्हा कल्लूच्या लग्नाच्या बातमी समोर आल्या, तेव्हा प्रत्येक वेळी अरविंद अकेला कल्लू म्हणाला की, ‘त्यांचे लग्न जिथे होईल, ते त्यांच्या घरच्यांच्या इच्छेनुसारच होईल.’
अरविंद अकेला कल्लू हा मूळचा बक्सर, बिहारचा असून बनारस येथील रहिवासी शिवानी पांडेशी 26 जानेवारी रोजी अंजली वाटिका येथे लग्न बंधनात अडकणार आहे. शिवानी पांडेच्या वडिलांचे नाव संतोष पांडे आणि आईचे नाव नीलम पांडे आहे. अरविंद अकेला कल्लूचा मोठा भाऊ आशुतोष चौबे याचे 7 मार्च 2019 रोजी बनारसमधील अंजली वाटिका येथे लग्न झाले होते. जिथे अरविंद अकेला कल्लू लग्न करणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लग्न हुंडा न घेता पार पडणार, ज्याचं चौफेर कौतुक हाेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 28 जानेवारीला बनारसमध्येच लग्नाच्या रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. लग्नसोहळ्यासाठी मुंबईतील काही खास लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. तर बाकीच्या पाहुण्यांना रिसेप्शन पार्टीत आमंत्रित केले आहे.(bhojpuri favourite star arvind akela kallu will tie the knot tomorrow with shivani pandey )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला तर…’, म्हणत ईशा केसकरने व्यक्त केली सिनेमाला प्राईम टाईम न मिळाल्याची खंत
वेणीमध्ये दिसणारी ही मुलगी आहे ‘टीव्ही क्वीन’, लाखाे हृदयांवर करते राज, ओळखा बरं काेण?