Friday, March 29, 2024

भोजपुरीतील सर्वात रोमँटिक गाणं होतंय व्हायरल, यामिनी सिंगच्या अदांवर फिदा झाला अरविंद अकेला कल्लू

बॉलिवूड, टॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणेच आता भोजपुरी चित्रपटसृष्टीही चांगली चर्चेत आहे. भोजपुरी गायक दरदिवशी आपली नवनवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. यामध्ये आता आणखी एका गायकाच्या नावाचा समावेश झाला आहे. तो गायक म्हणजेच अरविंद अकेला कल्लू होय. अशातच अरविंद आणि यामिनी सिंग यांचे भोजपुरी गाणे सध्या साेशल मीडियावर खूप व्हायरल हाेत आहे. या दमदार व्हिडिओमध्ये अरविंद अकेला कल्लू यामिनी सिंगसाेबत रोमान्स करताना दिसत आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. 

दाेघांची दमदार केमिस्ट्री पाहुण चाहते अभिनेत्यावर प्रेमाचा वर्षावर करत आहेत. या व्हिडिओमध्ये दाेघेही एकमेकांच्या डाेळ्यात बघत राेमॅंटिक वेळ घातवताना दिसत आहे. अरविंद अकेला कल्लू (Arvind Akela Kallu) याचे हे प्रसिद्ध गाणं विजेता चित्रपटातील आहे. या गाण्याचे टायटल ‘कारी कारी अंखियां’ (kari kari ankhiya) आहे. या गाण्याला अरविंदसाेबत हनी बीने गायलं आहे.

 

दाेघांच्या या जुगलबंदीने या गाण्याला सुपर-डूपर हिट बनवले आहे. अरविंद अकेला कल्लूचे हे गाणं 5 महिन्यांपूर्वी वर्ल्डवाईड रेकॉर्ड भोजपुरीवर रिलीज करण्यात आलं हाेतं. या गाण्याला आतापर्यंत 2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये यामिनीला साडीमध्ये बघून चाहते वेडे झाले आहे. या शानदार गाण्याचे लिरिक्स राकेश त्रिपाठी यांनी लिहिले आहेत. हा व्हिडिओ युट्यूबवर खूप धूमाकूळ घालताेय.

हेही वाचा- महेश बाबूची पत्नी नम्रताने दिवंगत सासूबाईंसाठी लिहिली भावूक पोस्ट; म्हणाली, ‘तुम्ही दिलेलं प्रेम…’

कल्लू आणि यामिनीने या चित्रपटात केलंय एकत्र काम
यामिनी सिंग आणि अरविंद अकेला कल्लूच्या जोडीला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळते. दोघांची बरीच गाणी खूप हिट ठरली आहेत. ‘कहिया ले मम्मी बनैबा’, ‘चुम्मा जब दोगी’, ‘पहले मम्मी को जाके मनाना’ ही गाणी दोघांच्या दमदार जोडीमुळे सुपरहिट झाली आहेत. याशिवाय कल्लू आणि यामिनीने ‘प्यार तो होना ही था’, ‘छलिया’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘धकधक गर्ल’ माधुरीसोबत ‘नॅशनल क्रश’ने धरला ठेका, व्हिडिओ पाहून तुमचेही थिरकतील पाय
आहा कडकच ना! नोरा फतेहीचा मराठमोळा लूक वेधतोय सर्वांचं लक्ष, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

हे देखील वाचा