भोजपुरी अभिनेता यश कुमार (Yash Kumar) याचा ‘घरवाली बाहरवली २’ या चित्रपटाचा ट्रेलर शनिवारी (५ फेब्रुवारी) रिशु मूव्हीज या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाला आहे. हा एक कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये यश कुमारने दोन लग्न केलेले असतात. या चित्रपटात भोजपुरीची प्रसिद्ध अभिनत्री स्मृती सिन्हा (Smriti Sinha) आणि रक्षा गुप्ता या दोघी मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
सामन्या जीवनात दोन लग्न करणं सोपं नाही. पण या चित्रपटात मनमौजी यश कुमार दोन लग्न करतो. यामध्ये स्मृती सिन्हा ही पहिल्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे, तर रक्षा गुप्ता ही दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारत आहे. यश कुमार रक्षा सोबत दुसरं लग्न करतो आणि नंतर सर्वजण एकत्र राहू लागतात. पण नंतर काय झालं असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता. ‘घरवाली बाहरवाली २’ या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सर्वांना माहितच आहे की, यश कुमार आणि दिग्दर्शक अजय श्रीवास्तव हे नेहमी वेगवेगळे चित्रपट घेऊन येत असतात. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. या चित्रपटाचा पहिला भाग सुद्धा चांगलाच यशस्वी झाला होता. जबरदस्त मनोरंजांसोबतच एक संदेशही या चित्रपटात दडला आहे. चित्रपटाची गाणी, संगीत आणि संवाद लक्षवेधी आहेत, जे तुम्हाला चित्रपटाशी जोडून ठेवतील.
‘घरवाली बाहरवाली २’ या चित्रपटाची निर्मिती अजय श्रीवास्तव प्रोडूक्शनने केली आहे आणि अक्षतफ़िल्म्स इंटरनॅशनलची निर्मिती संजय श्रीवास्तव यांनी केली. अजय श्रीवास्तव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. भोजपुरी अभिनेता यश कुमार, अभिनेत्री स्मृती सिन्हा, रक्षा गुप्ता यांच्यासह अनुप अरोरा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
हेही वाचा :