Saturday, July 6, 2024

‘पाचशेत काय काय करू’, म्हणत खेसारीने अभिनेत्रीलाच विचारला प्रश्न; भोजपुरी गाण्याची रंगलीये तुफान चर्चा

भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव हे त्यांच्या उत्कृष्ट गायनासाठी ओळखले जातात. त्याचे कोणतेही गाणे आले, तर धमाका होतो. अलिकडेच, त्याचं ‘बारिश’ हे गाणं रिलीज झालं आहे, ज्याला खूप पसंती मिळाली असून त्याच्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या दरम्यान, आता खेसारीचा आणखी एक म्यूझीक व्हिडिओ गाणे रिलीज झाले आहे, ज्याचे बोल आहेत ‘500 सौ में का का करबू’. यामध्ये तो अभिनेत्री हनी बीसोबत दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून, चाहते व्हिडिओवर भरभरुन प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

‘500 सौ में का करबू’ (500 Sau Mein Ka Ka Karbu) या भोजपुरी गाण्याचा (Bhojpuri gaana) व्हिडिओ एसआरके म्युझिकच्या यूट्यूब चॅनलने रिलीज केला आहे. यात खेसारी लाल यादव आणि अभिनेत्री हनी बी दिसत आहेत. यामध्ये दोघांमधील अप्रतिम डान्स मूव्ह आणि केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या व्हिडिओवर चाहते लाईक आणि कंमेट्सचा भरभरुन वर्षाव करत आहेत. त्याच्या या म्युझीक व्हिडिओला पन्नास हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

व्हिडिओमध्ये अभिनेता हनी बीला सांगतो की, “500 सौ में का करबू”, ज्यावर हनी बी म्हणते की, “फ्री के हमारा नाही प्यार चाही हो…”दोघांमधील सर्वोत्तम वाद पहायला मिळत आहे. हे ऑर्केस्ट्रा गाणे आहे. या म्युझीक व्हिडिओला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत.

‘500 सौ में का करबू’ या गाण्याच्या निर्मितीबद्दल सांगायचे झाले, तर  हे गाणे खेसरीसह गायिका हनी बीने गायले आहे.  त्यांच्या आवाजातील गाण्याचे बोल अतिशय गोड आहेत. खेसरीचे हे गाणे ‘डोली सजा के रखना’ या भोजपुरी चित्रपटातील आहे. दुर्गापूजेच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला हाेता. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटात खेसरीसोबत आम्रपाली दुबे व्यतिरिक्त रक्षा गुप्ता, विनोद मिश्रा, अनूप अरोरा, समर्थ चतुर्वेदी, अयाज खान, रीना राणी, विद्या सिंग, साहेब लालधारी, अखिलेश कुमार, बिना पांडे आणि संतोष पहेलवान महत्त्वाच्या भूमिकेत असुन निर्माता रोशन सिंग आहेत. लेखक-दिग्दर्शक रजनीश मिश्रा यांनी केले आहेत, तर संगीत आर्या शर्माने दिले आहे. याचे गीत कृष्णा बेदर्दी यांनी लिहिले असुन कोरिओग्राफर प्रसून यादव यांनी केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कॅटरिना, ईशान आणि सिद्धांत यांच्या ‘फोन भूत’चा ट्रेलर आऊट; चित्रपट या दिवशी होणार रिलीज

मराठमोळ्या माधुरी पवारने लंडनमध्ये नेसली साडी, सोशल मीडियावर रंगलीये एकच चर्चा

हे देखील वाचा