Saturday, May 10, 2025
Home भोजपूरी श्रावण महिन्यात पवन सिंगचे गाणे ‘ओम नम: शिवाय’ गाणे रिलीझ; एकाच दिवसात मिळाले ‘एवढे’ लाख लाईक्स

श्रावण महिन्यात पवन सिंगचे गाणे ‘ओम नम: शिवाय’ गाणे रिलीझ; एकाच दिवसात मिळाले ‘एवढे’ लाख लाईक्स

श्रावण महिन्यात भोजपुरी स्टार पवन सिंगची अनेक दणदणीत गाणी सध्या रिलीझ होत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याच्या गाण्यांच्या यादीत आणखी एका गाण्याचा समावेश झाला आहे. पवन सिंगचे नवीन गाणे ‘ओम नमः शिवाय’ रिलीझ झाले आहे. हे गाणं ऐकताच शिवभक्त नाचायला लागतील. ‘ओम नमः शिवाय’ हे गाणे माँ अम्मा फिल्म्सच्या यूट्यूब चॅनेलवर रिलीझ करण्यात आले आहे.

पवन सिंगने अलका झासोबत हे गाणे गायले आहे. इतकेच नव्हे, तर युजर्सना ही जोडी खूप आवडत आहे. हे गाणं भगवान शिव यांच्या स्वागतामध्ये बनवण्यात आले आहे आणि आता ते गाणं खूप व्हायरल होत आहे. रिलीझच्या काही तासातच या गाण्याला १ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. या गाण्याला आतापर्यंत १८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ६३ हजारांहून अधिक चाहत्यांनी या गाण्याला पसंती दर्शवली आहे.

पवन सिंगच्या या श्रावण विशेष गाण्याचे बोल रोशन सिंग विश्वास यांनी संगीतबद्ध केले आहेत, तर संगीत प्रियांशु सिंग यांचे आहे. या गाण्याचे दिग्दर्शन वेंकट महेश यांनी केले आहे, तर नृत्यदिग्दर्शक एम के गुप्ता आहेत. त्याची संकल्पना दीपक सिंगची आहे. पीआरओ रंजन सिन्हा आहेत. पवन सिंग हा ‘ओम नमः शिवाय’ या गाण्यासाठी खूप उत्साहित आहे.

तो म्हणाला की, “बाबा भोलेनाथ आपल्या सर्वांच्या हृदयात राहतात आणि जे हृदयात राहतात त्यांचेही खुल्या मनाने स्वागत केले जाते. म्हणून आम्ही त्यासाठी हे गाणे देखील तयार केले आहे, जे चाहत्यांना आवडेल. त्याचबरोबर चाहत्यांचे प्रेम आणि आशीर्वाद पाहून आम्ही भारावून गेलो आहोत.”

यापूर्वी पवनचे ‘पी ली पुदिना’ हे गाणे देखील रिलीझसह व्हायरल होऊ लागले होते. या गाण्यांला आतापर्यंत ३ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच, पायल देवसोबत त्याचे रिलीझ झालेले ‘बारिश बन जाना’ हे गाणे देखील यूट्यूबवर सतत ट्रेंड करत आहे आणि त्यालाही चांगली पसंती मिळत आहे. त्यांच्या या गाण्याचे बॉलिवूडमध्ये खूप कौतुक होत आहे. याशिवाय पवन सिंगची अशी अनेक गाणी आहेत, जी लाखो व्ह्यूजसह यूट्यूबवर आपली पकड ठेवत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉटनेसचा तडका! टीना दत्ताच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, पांढऱ्या मोनोकनीत दिल्या हटके पोझ

-खरं की काय? दीपिका पदुकोण चक्क अंतिमसंस्कारांच्या वेळी घातलेल्या कपड्यांचे करते लिलाव?, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

-निसर्गाच्या सानिध्यात हरवलीय पूजा सावंत, फोटो शेअर करत म्हणतेय, ‘जिथे जाल तिथे…’

हे देखील वाचा