‘व्हायरल स्टार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश मिश्राचे नवीन गाणे ‘पेन्हल ओढल छोड़ दा’ 13 एप्रिल रोजी रिलीझ होणार आहे. या गाण्याचा टिझर शुक्रवारी (9 एप्रिल) ‘हां फिल्म्स’च्या यूट्यूब चॅनलवर रिलीझ करण्यात आला होता. या गाण्याबद्दल राकेश खूपच उत्साही आहे.
याबद्दल बोलताना तो म्हणाले की, ‘मुलींच्या कपड्यांवर कमेंट करणाऱ्यांना हे गाणे चांगलाच धडा देईल. तसेच हे गाणे युजर्सचे मनोरंजन करेल, ज्याची झलक गाण्याच्या टिझरमध्ये पाहायला मिळाली आहे.’
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एक मुलगी छोटे कपडे घालून जात आहे, जिच्याभोवती काही लोक जमा होतात, तेव्हाच राकेश मिश्रा येऊन हे प्रकरण सोडवतो. या नव्या गाण्याचे गीतकार पवन पांडे आहेत, ज्यांनी यापूर्वीही राकेश मिश्रासाठी गाणी लिहिली आहेत. याशिवाय पवन पांडेने सुपरस्टार खेसारीलाल यादवसाठीही अनेक सुपरहिट गाणी लिहिली आहेत.
गाण्याचे संगीत शंकर सिंग यांनी दिले असून दिग्दर्शक पंकज सोनी आहेत. निर्माता शुभिका उपाध्याय आहेत, तर संतोष यादव एडिटर आहेत. हे गाणे सिंधू मेहता यांनी कोरिओग्राफ केले आहे. त्याचे पीआर संजय भूषण पटियालाने सांभाळले असून, डिजिटल हेड विक्की यादव आहे.
नुकतेच, भोजपुरी अभिनेता राकेश मिश्रा आणि पूनम दुबे यांच्या ‘दुश्मन सरहद पर के’ चित्रपटातील ‘सेज पर उडाव ना पतंग’ हे गाणेही खूप व्हायरल झाले होते. या गाण्यात राकेश मिश्रा आणि सुपर हॉट अभिनेत्री पूनम दुबे यांची केमिस्ट्री उत्कृष्ट होती. हे गाणे श्याम देहाती लिखित असून, आवाज अलका झा यांनी दिला होता आणि संगीत दिग्दर्शक छोटे बाबा होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मी परफेक्ट नाहीये’, लूकबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनुष्काने दिले होते प्रत्युत्तर