Thursday, April 24, 2025
Home भोजपूरी कमालच! भोजपुरी स्टार ऋचा दीक्षित आणि प्रवेश लालने केला ‘काली नागिन के जैसी…’ गाण्यावर रोमान्स

कमालच! भोजपुरी स्टार ऋचा दीक्षित आणि प्रवेश लालने केला ‘काली नागिन के जैसी…’ गाण्यावर रोमान्स

अभिनेत्री ऋचा दीक्षित आणि अभिनेता प्रवेश लाल यादव यांनी नुकताच एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी आमिर खान अभिनित ‘मन’ चित्रपटातील ‘काली नागिन के जैसी’ हे गाणे रिक्रिएट केले आहे. ऋचाने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे आणि प्रवेशने डेनिम जॅकेट परिधान केले आहे.

आता या व्हिडिओवर जोरदार लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. हे गाणे उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायले होते. याव्यतिरिक्त हे दोन कलाकार सध्या ‘प्रीतम प्यारे’ चित्रपटाची शूटिंग करत आहेत आणि हा व्हिडिओ प्रमोशनच्या रूपात पाहिला जात आहे.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. यामिनी सिंगदेखील या चित्रपटात खास भूमिकेत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय श्रीवास्तव आणि संदीप सिंग करत आहेत, तर निर्माते सुभाष चव्हाण आहेत. याशिवाय मंजुल ठाकूर दिग्दर्शित ‘जैसी करनी वैसी भरनी चित्रपटातही ऋचा आणि प्रवेश एकत्र दिसणार आहेत.

भोजपुरी अभिनेत्री ऋचा दीक्षित सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच, तिचे योगा करतानाचे काही फोटो मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. गुलाबी रंगाचा टॉप घातलेली ऋचा या फोटोंमध्ये खूपच सुंदर आणि फिट दिसत होती. या फोटोंद्वारे ऋचा तिच्या फॉलोअर्सला योगा करण्यास प्रवृत्त करत होती. ती बहुतेकदा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्यायाम करतानाचे पोस्ट शेअर करत असते, ज्यांना तिच्या चाहत्यांकडून खूप प्रेम मिळते. ती अनेक भोजपुरी हिट चित्रपटाचा भाग राहिली आहे. भोजपुरी चित्रपटांशिवाय ऋचा अनेक हिंदी रिऍलिटी शोमध्ये देखील दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खेसारी लाल यादवच्या ‘पड़ोसन शोषण करती है’ गाण्याचा यूट्यूबवर राडा! पार केला २८ लाख व्ह्यूजचा टप्पा

-जान्हवी कपूरच्या डान्स स्टेप्स कॉपी करत मोनालिसाने लावले ‘नदियों पार’ गाण्यावर जोरदार ठुमके! पाहा व्हिडिओ

-थ्रोबॅक व्हिडिओ शेअर करत अनुष्काने सांगितल्या मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या आठवणी

हे देखील वाचा