Monday, July 1, 2024

‘लाल साडी’ ने चाहते झाले घायाळ, सुपरस्टार रितेश पांडेचं गाणं यूट्यूबवर जोरदार व्हायरल

भोजपुरी सुपरस्टार रितेश पांडे जेव्हाही नवीन गाणे घेऊन येतो, तेव्हा ते काही काळातच व्हायरल होते. रितेश पांडेच्या नवीनच नाही तर जुन्या गाण्यांचा प्रवासदेखील अजूनही अबाधित आहे. त्यांच्या ‘हॅलो कौन’ या गाण्याने यूट्यूबवर ६०० मिलियन व्ह्यूजचा टप्पा ओलांडला असून २०२० मध्ये ग्लोबल यूट्यूब म्युझिक व्हिडिओ चार्टवर पहिल्या क्रमांकावर होते. सोबतच आतापर्यंत सर्वाधिक पाहिलं जाणारं हे गाणं आहे. रितेश हा प्रामुख्याने भोजपुरी फिल्म इंडस्ट्री मध्ये काम करतो.

रितेश पांडे यांचे सुपरहिट गाणे ‘गोरी तेरी चूनरी बा लाल लाल रे’ आधी प्रेक्षकांमध्ये खूपच पसंती आहे. या गाण्याने त्याच्या यशाची नवीन पायरी निर्माण केली आहे. आता त्याचे आणखी एक गाणे आहे, जे यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. रितेश पांडे यांचे ‘लाल साडी’ हे गाणे आहे जे संगीत रसिकांमध्ये चांगलेच व्हायरल झाले आहे.

सदर गाणं हे ग्लोबल म्युझिक जंक्शन यूट्यूब चैनलवरून रिलीज केले आहे. सोबतच यूट्यूबवर सुद्धा या गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रितेश याने हे गाणे आपल्या खास स्टाईलमध्ये गायले असून गाण्याचे बोल राहुल रंजन यांनी लिहिले आहेत.

गाण्याची रचना देखील राहुल रंजन यांनी उत्कृष्टरीत्या केली आहे. या गाण्यामध्ये रितेश पांडे समवेत नेहा ओझा देखील असून ती कमालीची सुंदर दिसत आहे. सोबतच रितेश पांडेदेखील या डॅशिंग लुकमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

रितेश पांडे याने कोरोबार, पंडिजी के पहिले, लपलप करे, गोरी पतरकी रे, गोरी तोर चुनरी, जियो हो जलेबी यांसारखे गाणे गायले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी राणी वेड्स राजा, काशी विश्वनाथ, नाचे नागीण गली गली सारख्या चित्रपटात देखील काम केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

जाळ अन् धूर संगटच! रितेश पांडे आणि अक्षरा सिंगच्या नव्या गाण्याची यूटुबवर चलती, लाखो हिट्सचा होतोय वर्षाव

भोजपुरी अभिनेत्रीलाही नाही आवरला मोह, थेट नेहा कक्करच्या ‘या’ गाण्यावर धरला ठेका

हे देखील वाचा