Thursday, June 13, 2024

अल्पवयीन मुलीवर बला’त्कार केल्याप्रकरणी प्रसिद्ध गायकाला अटक, सोशल मीडियावर फोटो केले पोस्ट

भोजपुरी सिनेमाची आजकाल चांगलीच चर्चा होत असते. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाकारांसोबतच भोजपुरी इंडस्ट्रीतील गायक, अभिनेते आणि अभिनेत्रीही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मात्र, यावेळी जी बातमी समोर येत आहे ती थोडी धक्कादायक आहे. खरे तर, भोजपुरी गायक अभिषेक उर्फ ​​बाबुल बिहारी याला अल्पवयीन मुलीवर बला’त्कार आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी आरोपीची ओळख बिहारचा अभिषेक या नावाने केली आहे, ज्याला भोजपुरी गायक बाबुल बिहारी म्हणूनही ओळखले जाते. गायकाचे वय अवघे 21 वर्षे सांगितले जात आहे. गायकाचे त्याच्या यूट्यूब चॅनेलवर 27,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दोन वर्षांपूर्वी राजीव नगर परिसरात राहणाऱ्या 13 वर्षीय मुलीचे अपहरण केले होते. तिच्याशी मैत्री केल्यानंतर तो तिला हॉटेलच्या खोलीत घेऊन गेला हाेता आणि तिथे गेल्यानंतर त्याने तिचा बला’त्कार केला आणि तिचे फोटो काढले.

घटनेनंतर अल्पवयीन मुलीने आरोपीपासून अंतर ठेवले आणि त्याच्याबद्दल कोणाला काहीही सांगितले नाही. अशात आता एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आरोपीने काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. ती फाेटाे पाहिल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी मुलीची विचारपूस केली, ज्यानंतर तिने झालेली घटना सांगितली.’

पीडितेचे कुटुंबीय बुधवारी (7 जुन)ला तिला पोलिसात घेऊन गेले. पीडितेचे समुपदेशन केल्यानंतर, सेक्टर 14 पोलिस स्टेशनमध्ये मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायदा आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यांतर्गत आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली. पोलिस प्रवक्ते सुभाष बोकन यांनी सांगितले की, ‘तक्रारीनुसार एफआयआर नोंदवण्यात आली असून काही तासातच आरोपीला अटक करण्यात आली आहे.’  (bhojpuri singer babul bihari aka abhishek arrested for raping minor posting her pictures on social media)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘चांदीची पालखी चमकायला लागलीय’, अभिनेते किरण माने यांची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
‘कृष्णधवल’ फिल्टरमध्ये रिंकू राजगुरुचं मोहक साैंदर्य, एकदा पाहाच

हे देखील वाचा