Friday, July 5, 2024

मोनू अलबेलाचे ‘नदी बीचे कमरिया डोले’ नवीन गाणे रिलीझ; एकाच दिवसात मिळाले ३ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

भोजपुरी चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज गायकांचा भरणा आहे. त्यांचे नेहमी कोणते ना कोणते गाणे रिलीझ होत असतात. यातीलच एक गायक म्हणजे मोनू अलबेला. सोनूला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याचे सर्वच गाणे भोजपुरी इंडस्ट्रीत धुमाकूळ घालत आहे.अशातच त्याचे आणखी एक नवीन गाणे रिलीझ झाले आहे. या गाण्याचे नाव ‘नदी बीचे कमरिया डोले’ आहे. हे गाणे तुफान व्हायरल होत आहे.

मोनू अलबेलाचे गाणे ‘नदी बीचे कमरिया डोले’ला जोरदार पसंती मिळत आहे. हे गाणे भव्य पद्धतीने शूट केले आहे. ज्यामुळे चाहत्यांना हे गाणे खूपच आवडत आहे. या गाण्यात मोनूसोबत भोजपुरी अभिनेत्री तृषाकर मधू झळकली आहे. तिचा अंदाज आणि अदा भोजपुरी प्रेक्षकांच्या मनाला भिडताना दिसत आहेत.

मोनू अलबेला आणि तृषाकरची केमिस्ट्री, त्यांचा डान्स, नदीच्या किनाऱ्यावरील रोमान्स हे सर्वच प्रेक्षकांना प्रभावित करत आहे. या धमाकेदार गाण्याला आणखी एका गायिकेने आपला आवाज दिला आहे. ती म्हणजेच प्रसिद्ध गायिका अंतरा सिंग प्रियांका होय. अंतराचे गाणे भोजपुरीच्या टॉप ट्रेंडिंग गाण्यांच्या यादीत सामील असतात.

हे गाणे राजधानी हिट्स या यूट्यूब चॅनेलवर मंगळवारी (१ जून) प्रदर्शित केले होते. एकाच दिवसात या गाण्याला ३ लाख ५० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

खरं तर मोनू अलबेला आणि अंतरा सिंग प्रियांकाच्या गोड सुरात गायलेल्या या गाण्याचे बोल अजय बच्चन यांनी लिहिले आहेत. दुसरीकडे गाण्याला संगीत हे दिलकश यांनी दिले आहे. याव्यतिरिक्त या गाण्याचे दिग्दर्शन ऋषी सम्राट यांनी केले आहे. गाण्यात भन्नाट डान्सही पाहायला मिळत आहे. गाण्याची कोरिओग्राफी पंकज कैटी आणि माधव यांनी केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा