Wednesday, August 6, 2025
Home भोजपूरी मोनालिसाला आठवलं कोरोनाच्या आधीचे आयुष्य; आई- वडिलांसोबतचा फोटो शेअर करत दिला जुन्या आठवणींना उजाळा

मोनालिसाला आठवलं कोरोनाच्या आधीचे आयुष्य; आई- वडिलांसोबतचा फोटो शेअर करत दिला जुन्या आठवणींना उजाळा

भोजपुरी सिनेमांमध्ये सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मोनालिसाचे लाखो चाहते आहेत. बर्‍याच भोजपुरी चित्रपटांत काम करणार्‍या मोनालिसाने आता खलनायिका म्हणून टीव्हीच्या जगातही अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने कोरोनावर मात केली आहे.

भोजपुरी इंडस्ट्रीबद्दल बोलायचे झाले, तर अनेक कलाकार कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. यामध्ये आम्रपाली दुबे आणि दिनेशलाल निरहुआ यांचाही समावेश आहे. यादरम्यान, मोनालिसाला कोरोना येण्याच्या आधीचे आयुष्य आठवत आहे. नुकतेच, अभिनेत्रीने इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या पालकांसोबतचे काही थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत.

मोनालिसाने इंस्टाग्रामवर तिच्या आई- वडिलांसोबतचे बरेच फोटो शेअर केले आहेत. पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये मोनालिसा लाल सूटमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. मोनालिसाचे खूप कौतुक केले जात आहे. तिने या फोटोंसह कॅप्शनमध्ये लिहिले, “बाबा, मी आणि आई.”

या फोटोमध्ये मोनालिसासोबत तिची आईसुद्धा लाल रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. खरं तर हे फोटो कोव्हिडच्या आधीचे आहेत. पालकांसोबत बाहेर जातानाचे फोटो शेअर करत अभिनेत्री जुने दिवस आठवताना दिसली.

मोनालिसाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने बऱ्याच भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. भोजपुरी चित्रपटात अभिनेत्री म्हणून आपला ठसा उमटल्यानंतर, मोनालिसाला बिग बॉसमधून मोठा ब्रेक मिळाला. या शोमधून तिला देशभरात लोकप्रियता मिळाली. बिग बॉसमध्ये नाव कमावल्यानंतर तिने टीव्हीच्या जगात प्रवेश केला. मोनालिसाने बर्‍याच मालिकांमध्ये खलनायिकेची भूमिका साकारली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बोल्ड अँड ब्युटीफुल! रश्मी देसाई तिच्या बोल्डनेसने करतेय सर्वांना घायाळ! तुम्ही पाहिलेत का तिचे ‘हे’ फोटो?

-समंथा अक्किनेनीने शेअर केला बोल्ड लूक; पाहा हिरव्या- सोनेरी गाऊनमधील ग्लॅमरस अभिनेत्रीची हॉटनेस

-सलमान-अक्षयबरोबर काम केलेल्या अभिनेत्रीचे बिकीनवरील फोटो-व्हिडीओ व्हायरल, तुम्हीही टाका एक नजर

हे देखील वाचा