भोजपुरी सिनेसृष्टीतून मोठी बातमी समोर येत आहे. सुपरस्टार दिनेश लाल यादव म्हणजेच निरहुआ याने दु:खद बातमी दिली आहे. निरहुआ याने सांगितले आहे की, त्याच्या भावाचा म्हणजेच विजय लाल यादव याचा अपघात झाला आहे. निरहुआने दिलेल्या या बातमीनंतर त्याचे चाहते चिंतेत आहेत आणि विजय यादव लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करत आहेत. विजय याला उपचारासाठी एका रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
दिनेश लाल यादवचे ट्वीट
दिनेश लाल यादव (Dinesh Lal Yadav) याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही बातमी दिली. त्याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “मोठा भाऊ विजय लाल यादव यांच्या कारचा लखनऊला जाताना अपघात झाला. आमच्या प्रतिनिधीने भैय्याशी चर्चा केली. त्यांना वेदांत हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे. प्रवेश लाल आणि कवीजी तिथे पोहोचले आहेत. आम्हीही लवकरच भैय्याला भेटण्यासाठी पोहोचू. बाबा विश्वनाथ भैय्याला लवकर बरे करो.”
बड़े भैया विजय लाल यादव जी की कार लखनऊ जाने के क्रम में दुर्घटना ग्रस्त हो गयी। हमारे प्रतिनिधि ने भैया से बात कराया, उन्हें वेदन्ता हॉस्पिटल ले जाया जा रहा है। प्रवेश लाल और कवि जी वहाँ पहुँच रहे हैं। हम लोग भी जल्द भैया के पास पहुँच जाएँगे। बाबा विश्वनाथ जल्द स्वास्थ्य लाभ दें।
— Nirahua Hindustani (@nirahua1) June 30, 2022
माध्यमांतील वृत्तानुसार, दिनेशचा भाऊ विजय लाल यादव (Vijay Lal Yadav) आपल्या सहकाऱ्यांसह लखनऊहून आझमगडला जात होता. या प्रवासादरम्यान त्यांच्या फॉर्च्युनर कारचा बाराबंकीजवळ अपघात झाला. विजय लाल यादव ज्या वाहनात होते त्याचा वेग इतका होता की, डिव्हायडरला धडकल्याने गाडी पलटी होऊन त्याचा चुरा झाला. एवढेच नाही, तर कार ज्या दुभाजकाला धडकली तोही तुटला.
Birha Samrat Vijay Lal Yadav ka aaj accident ho gaya hai aapke Dilon per Karne Wale 35 Sal se Birha Samrat Vijay Lal Yadav ji ka Bhagwan se unke Liye Dua Jarur Mange aap log Samajwadi Party Mein Jab Hamari Sarkar Thi To Minister bhi the pic.twitter.com/r0ztTXcwfD
— singer Sanjay sanvariya (@SanjaybhaiEnte1) June 30, 2022
असेही म्हटले जात आहे की, धडकेनंतर कार हवेत सुमारे २० मीटर उडाली. या अपघाताची माहिती मिळताच विजय लाल यादव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या समर्थकाने फोन उचलला आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर दिनेश लाल यादव यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली.
कोण आहे विजय लाल यादव?
दिनेश लाल यादव याच्याप्रमाणेच त्याचा भाऊ विजयही (Dinesh Lal Yadav Brother Vijay Lal Yadav) राजकारणाशी संबंधित आहे. विजय लाल यादव हे समाजवादी पक्षात मंत्री राहिला आहेत. यावेळी ते आझमगड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रचार करताना दिसले. त्यांनी सपा उमेदवार धर्मेंद्र यादव यांना पाठिंबा दिला होता, तर त्यांचे भाऊ दिनेश लाल यादव निरहुआ यांना पाठिंबा दिला नाही. मात्र, या निवडणुकीत भाजपचे उमेदवार दिनेश लाल यादव विजयी झाले. सध्या चाहते विजय यांच्या बरे होण्यासाठी सोशल मीडियावर प्रार्थना करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-