भोजपुरी स्टार खेसारी लाल यादव दिवसेंदिवस नवनवीन गाणी घेऊन येत आहे. त्याच्या गाण्यांनी कोट्यवधी व्ह्यूज मिळवले आहेत. सध्या त्याचे एक गाणे जोरदार व्हायरल होत आहे. हे गाणे कोट्यवधी व्ह्यूज मिळवणाऱ्या गाण्यांच्या यादीत सामील झाले आहे. खेसारीचं असं कोणतं गाणं आहे, जे युट्यूबवर तुफान राडा घालत आहे, चला जाणून घेऊया…
खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) याच्या गाण्याचे नाव ‘कोका कोला बोलबम’ (Coca Cola Bolbam) असे आहे. या गाण्याला चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. हे गाणे युट्यूबवर प्रदर्शित होताच धमाल करत आहे. खेसारीचे हे भोजपुरी गाणे ‘कोका कोला बोलबम’ गणनायक फिल्म्स या युट्यूब चॅनेलवर २७ जून, २०२२ रोजी प्रदर्शित झाले आहे.
काय आहे गाण्यात?
खेसारी लाल यादव याच्या ‘कोका कोला बोलबम’ गाण्यात त्याच्यासोबत भोजपुरी अभिनेत्री राणी दिसत आहे. यामध्ये त्याची सहअभिनेत्रीला त्याला श्रावणाच्या निमित्ताने देवघरात जाण्यासाठी सांगत आहे. मात्र, पैसे नसल्यामुळे तो तिला नकार देतो. अशात अभिनेत्याची अभिनेत्री त्याच्यावर नाराज होते. या व्हिडिओत त्यांच्यात मजेशीर भांडणही पाहायला मिळत आहे. या गाण्यातून हे जोडपे भक्तीभाव दाखवत आहेत.
युट्यूबवर गाण्याची धमाल
खेसारी लाल यादव याच्या या गाण्याला युट्यूबवर फक्त ११ दिवसात १ कोटी ४४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे, या गाण्यावर ३ लाखांहून अधिक लाईक्सचा पाऊसही पडला आहे. या गाण्याच्या व्ह्यूजमध्ये वाढ होत आहे.
कोणी गायलंय गाणं?
‘कोका कोला बोलबम’ हे गाणे खेसारी लाल यादव आणि शिल्पी राज यांनी मिळून गायले आहे. दोघांच्याही आवाजातील हे गाणे चाहत्यांना खूप आवडत आहे. गाण्याचे बोल प्रकाश बारूद यांनी लिहिले आहेत. या गाण्याचे संगीत दिग्दर्शन सरविंद मल्हार आहेत.
‘ब्रँडेड भक्त’ गाणेही प्रदर्शित
अशातच खेसारीचे ‘ब्रँडेड भक्त’ हे गाणेही प्रदर्शित झाले आहे. यामध्ये त्याच्यासोबत सहअभिनेत्री अनीषा पांडे दमदार अंदाजात दिसत आहे. हे गाणे प्रियांका सिंग हिच्यासोबत मिळून गायले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तू माझा आनंद, माझा अभिमान’, लेकासाठीची अमिताभ बच्चन यांची ‘ती’ भावूक पोस्ट व्हायरल
‘काय लहान बाळासारखं रडतंय’, खिलाडी बनायला निघालेल्या निशांतच्या व्हिडिओवर नेटकऱ्याची लक्षवेधी कमेंट