भोजपुरी इंडस्ट्रीतील सुपरस्टार खेसारी लाल यादव हा आपल्या सिनेमांव्यतिरिक्त गाण्यांनीही चाहत्यांची मने जिंकण्यात आघाडीवर असतो. त्याच्या नवीन गाण्यांसोबतच त्याची जुनी गाणीही ट्रेंड करू लागतात. असेच काहीसे आता पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. खेसारीचे एक गाणे सध्या युट्यूबवर चांगलीच धमाल करत आहे. चला तर जाणून घेऊया त्याच्या गाण्याबद्दल आणि गाण्याला मिळालेल्या व्ह्यूजबद्दल.
खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) याच्या गाण्याचे बोल ‘मिलते मरद हमके भूल गईलू’ (Milte Marad Hamke Bhul Gai Lu) असे आहे. त्याच्या या गाण्यात खेसारी आपल्या प्रेमिकेवर रुसल्याचे दिसत आहे. तिने खूप विनवण्या करूनदेखील खेसारी तिचे काही ऐकून घेत नाही.
किती लोकांनी पाहिला व्हिडिओ?
खेसारीचे ‘मिलते मरद हमके भूल गईलू’ या गाण्याला आतापर्यंत ३६ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. गाण्यात खेसारीसोबत अभिनेत्री चांदनी सिंग (Chandani Singh) त्याच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत आहे. तसं पाहिले, तर म्युझिक व्हिडिओंमध्ये नेहमी प्रेमी त्याच्या प्रेमिकेची समजूत काढताना दिसतो. मात्र, इथे सगळं उलट आहे. व्हिडिओत दिसते की, खेसारीची सहअभिनेत्री सतत त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करते. मात्र, तो तिचं काहीएक ऐकत नाही. चाहत्यांना अभिनेत्याचा हा अंदाज फारच आवडला आहे. तसेच, तो या व्हिडिओत खूपच चांगले एक्सप्रेशन्स देत आहे.
व्हिडिओत चांदनी त्याला समजावते की, आता त्याचे लग्न झाले आहे आणि आता पूर्वीप्रमाणे स्वातंत्र्य नाहीये. यावर खेसारी म्हणतो की, “मरद मिलते हमके भूल गईलू.” व्हिडिओला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ आदिशक्ती युट्यूब चॅनेलवर नोव्हेंबर २०१७ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र, याचे गाणे आजही चाहत्यांच्या ओठांवर आहे.
काजल राघवानीच्या केमिस्ट्रीलाही मिळालेत रेकॉर्डतोड व्ह्यूज
‘मिलते मरद हमके भूल गईलू’ या गाण्याव्यतिरिक्त खेसारीच्या भोजपुरी सिनेमा ‘दीवानापन’मधील एक गाणे ‘कूलर कुर्ती में’ चाहत्यांना खूपच आवडले आहे. या गाण्याला आतापर्यंत कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. यामध्ये काजल राघवानी (Khesari Lal Yadav And Kajal Raghwani Chemistry) सोबतच्या त्याच्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. या गाण्याला युट्यूबवर ३० कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-